जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची वेळापत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत class three transfer
सेवा विषयक माहीती सादर करण्याबाबत.
संदर्भ: १) शासन निर्णय क्रमांक जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४ दिनांक १५ में २०१४.
२) शासन शुध्दीपत्रक क्रमांक जिपब४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४ दिनांक २ जुलै २०१४.
३) शासन शुध्दीपत्रक क्र. जिपब ४८१६/प्र.क्र.१३६/आस्था-१४ दिनांक २ जानेवारी, २०१७. ४) शासन पुरकपत्र क्रमांकः जिपब-४८१७/प्र.क्र. २२८/आस्था-१४ दिनांक ०७ मार्च, २०१९
५) शासन शुध्दीपत्रक क्रमांकः जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४ दिनांक ०८ मार्च, २०१९
जिल्हा परिषद अमरावतीचे पत्र येथे पहा pdf download
उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा स्तरावरील दिनांक ५ मे ते १५ मे व तालुकास्तरावरुन दिनांक १६ मे ते २५ मे पर्यत बदल्या करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयामध्ये जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय बदल्याचे वेळापत्रक कार्यसूची ठरवून देण्यात आलेली आहे. सन २०२४ सर्वसाधारण बदली प्रक्रियेचे वेळापत्रक शासन स्तरावरुन प्राप्त होणा-या निर्देशानुसार राहील. त्याअनुषंगाने बदली प्रक्रियेची पुर्व नियोजित अंमलबजावणी करणेस्तव आपणास कळविण्यात येते की सर्वसाधारण बदली प्रक्रीया २०२४ मधील बदली प्रक्रीयेची अंमलबजावणी करिता सामान्य प्रशासन विभाग, नियंत्रीत संवर्गामधील आपले कार्यालयातील व आपले कार्यालयाचे अधिनस्त येणारी सर्व कार्यालयातील कार्यरत सर्व गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) या संवर्गाच्या कर्मचाऱ्याची माहिती सोबत दिलेल्या प्रपत्रामध्ये अचुक पणे प्रथम प्राध्यान्य देवून वास्तव्य जेष्ठता सुची तयार करुन सादर करण्यात यावी. सुची तयार करण्याकरिता आपले कार्यालयातील कार्यरत आस्थापना सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचेवर जबाबदारी सोपविण्यात यावी. माहीती ही बरोबर तयार करीत असल्याची वेळोवेळी शहानिशा विभागातील खाते प्रमुख व पं.स. स्तरावरील गट विकास अधिकारी यांनी करावी सदहु संपूर्ण संवर्गनिहाय अधिनस्त येत असलेली कार्यालयाची संकलीत माहीती तयार करुन दिलेल्या प्रपत्रात ISM VE DVBW-TT SUREKH FONT- १४ (EXCEL) मध्ये सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद अमरावती येथे शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने कार्यवाही करुन मार्च २०२४ पुर्वी सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचे कडुन तपासणी करुन कार्यासन लिपीक आस्था-१ साप्रवि जि.प. अमरावती यांचेकडे स्वाक्षरी असलेली हार्ड कॉपीची प्रतिसह संवर्गनिहाय एक प्रत तसेच सदर्छु माहिती पेन ड्राईव्ह मध्ये सुध्दा अचूकपणे सादर करावी.
तेव्हा याव्दारे आपणास पुनच्छ सुचित करण्यात येते कि, विषयांकित माहिती मार्च-२०२४ पर्यंत प्रत्यक्ष सादर करावी, सदर माहिती सादर करत असतांना आपले कार्यालयाचे अंतर्गत येणारी सर्व कार्यालये तसेच पंचायत समितीच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालये येथील कर्मचारी यांची माहिती संकलीत स्वरुपात तयार करण्यात आलेल्या वास्तव्य जेष्ठता सुची मध्ये अचुक माहीती तयार केली किंवा नाही माहीती ही सेवा पुस्तीकेची पडताळणी करून तयार करण्यात आली आहे किया नाही या बाबत अधिनस्त सर्व स्थानिक कार्यालयातील आस्थापना विषयक कार्यरत असलेल्या कर्मचारी यांची एकत्रित सभा घेण्यात यावी त्यामध्ये वास्तव्य जेष्ठता सुचिची पडताळणी स्थानिक क.प्र.अ. स.प्र.अ यांनी करावी बदली पात्र कर्मचारी सुटणार नाही याची शहानिशा करुन दक्षता घेण्यात यावी, माहिती तयार करण्यापुर्वी शासन निर्णयाचे अवलोकन करून दिलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने माहीती विहीत कालमर्यादेत सादर करण्यात यावी.
Scanned with OKEN Scanner
तसेच शासन निर्णयामध्ये बदली प्रक्रीयेपूर्वी बदलीच्या निकषामध्ये काही बदल झाल्यास सुधारीत प्रमाणे माहीती सादर करावी लागेल. माहीती सादर करतांना सोबत दिलेल्या प्रपत्रातील रकाना क्रं. १३ ते १८ बाबत योग्य तो पूरावा त्यावर सदर कर्मचाऱ्याचा यादीतील अ.क्र. नमुद करुन यादीसोबत जोडण्यात यावा तसेच अपंग कर्मचारी असल्यास त्यांचे मुळ सेवापुस्तीकेत Online प्रमाणपत्रावरुन UNIQUE DISABILITY ID ची नोंद घेवुन सेवा पुस्तकाच्या नोंदीची, Online दिव्यांग प्रमाणपत्र व U.D.I.D च्या छाया प्रतीसह सादर करावे. असे न केल्यास सदर कर्मचाऱ्यास बदलीमधुन सुट किंवा प्राध्यान्य क्रमानुसार स्थानांतर मिळणार नाही. पुरावा जोडल्याशिवाय सदरहू बाबीचा उल्लेख वास्तव्य सुचीमध्ये करण्यात येवू नये नमुद करू नये. तसेच धारणी व चिखलदरा या अनुसूचित क्षेत्रामधील कार्यरत असणारे कर्मचारी यांनी जर धारणी व चिखलदरा या सदरच्या क्षेत्रामध्ये राहण्याबाबत विकल्प दिल्यास त्या विकल्पाच्या प्रती सुध्दा सादर करावयाच्या यादीतील संबधीत कर्मचारी यांचा अ.क्रं. विकल्पा वरील भागावरती डाव्या बाजुस नोंदवून सोबत पद निहाय जोडण्यात यावा. पून्हा नव्याने प्राप्त विकल्पाचा विचार केला जाणार नाही सदर्ह संपूर्ण माहीती ही (Excel) मध्ये पद निहाय वेगवेगळ्या Sheet तयार करुन आस्थापना सहाय्यक यांनी किंवा कप्रअ, सप्रअ यांनी प्रत्यक्षपणे या कार्यालयात आस्थापना सहाय्यक यांचेकडे तपासनि करुन सादर करावी. सदर माहीती प्रेषक विभागात सादर करण्यात येवू नये वास्तव्य सुचीमध्ये मधील प्रस्तावाच्या दस्ताऐवज प्रत्येक संवर्गानुसार व प्रस्तावित क्रमानुसार स्पष्टपणे दिसुन येतील या स्वरुपात जोडण्यात यावा. कारण बरेच कार्यालयातील माहीती ही चुकीची तयार करुन तपासनी न करता प्रेषक विभागामध्ये सादर करुन संबधीत कर्मचारी निघून जातात त्यामुळे कार्यालयीन अडचण निर्माण होते त्यामुळे सदरची माहीती ही संबंधीत कार्यालयाने प्रत्यक्ष सादर करावी. सदरची माहीती तयार करताना काही अडचणी आल्यास या कार्यालयाशी संर्पक साधावा आपण चुकीच्या सादर केलेल्या वास्तव्य सुचीमुळे बदलीप्रक्रियेत अनियमितता झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही आपल्या कार्यालयाची राहील याची कटाक्षाने आपले स्तरावर नोंद घेण्यात यावी.
सहपत्र प्रपत्र अ