जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया सन-२०२४ class 3 and 4 servant transfer
जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण संदर्भ क्र.१ ने निश्चित केलेले असुन, बदल्यांचे वेळापत्रकही निश्चित करून दिलेले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे बदल्यांची कार्यवाही करणे बंधनकारक आहे.
जिल्हा परिषदेचे पत्र येथे पहा pdf download
त्यानुसार प्रशासकिय व विनंती बदल्यांची कार्यवाही ३१ मे पर्यंत होणे आवश्यक आहे. प्रशासकिय बदल्यांच्या धोरणानुसार कर्मचाऱ्यांची त्या कॅलेंडर वर्षाच्या ३१ मे पर्यंत झालेली सलग वास्तव सेवा विचारात घ्यावयाची आहे. किमान १० वर्षे अशी सलग सेवा झालेले कर्मचारी जिल्हास्तरीय प्रशासकिय बदलीसाठी पात्र ठरतील. (मात्र वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचा-यांस प्रशासकिय बदलीतून सूट आहे ही बाब लक्षात घ्यावी.) प्रशासकीय बदल्यांसाठीची टक्केवारी १० टक्के इतकी निश्चित केलेली आहे. अशी माहिती एकत्रित करून त्याची संभाव्य जेष्ठता यादी १७ एप्रिल रोजी प्रसिध्द करावयाची आहे.
त्यामुळे निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी माहिती वेळेत प्राप्त होणे आवश्यक आहे. तरी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालयांमधील, एकाच मुख्यालयात सलग १० वर्षे सेवा झालेल्या, वर्ग-३ च्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या नमुन्यात, डीव्हीबी टीटी सुरेख या फाँटमध्ये फॉट साईज-१४ मध्ये व लिगल साईज कागदावर, संवर्गनिहाय वेगवेगळी तयार करुन, ती गुरुवार दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी संवर्गनिहाय ज्या त्या खातेप्रमुखांकडे सादर करण्यासाठी ज्या त्या कार्यालयातील कक्ष अधिकारी / अधिक्षक यांनी माहिती हार्ड कॉपी व सॉप्ट कॉपी अशा दोन्ही प्रकारात घेऊन स्वतः उपस्थित रहावे.
प्राधान्यक्रमाने करावयाच्या विनंती बदल्यांबाबत संदर्भ क्र.४ चे शासन पुरकपत्रकाव्दारे, शासनाने किमान ५ वर्षाऐवजी किमान ०३ वर्षे सलग सेवा असा बदल केलेला आहे. ही बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून, अट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विनंती अर्ज यापूर्वी दिलेल्या नमुन्यात स्विकारावेत, विनंतीपात्र कर्मचाऱ्यांच्या जेष्ठतेनुसार यादी दि.०२ मे पर्यंत प्रसिध्द करावयाची असल्याने, विनंती बदलीचे अर्ज व त्याची एकत्रित माहिती गेल्या वर्षाप्रमाणेच दि.२० एप्रिल पर्यंत ज्या त्या संबधित संवर्गाच्या खाते प्रमुखांच्याकडे सादर करावी. शासनाकडे नव्याने काही सुचना प्राप्त झाल्यास त्या बाबत स्वतंत्ररित्या कळविणेत येत आहे.
प्रशासकिय बदल्यांबाबतची लिपिकवर्गीय संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन संबधित कक्ष अधिकारी / अधिक्षक यांनी गुरुवार दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता सामान्य प्रशासन विभागाकडे उपस्थित राहावे.
जिल्हा परिषदेचे पत्र येथे पहा
👉pdf download