मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा प्रथम बक्षिस 51 लाख रूपये chief minister my school beautiful school
अभियान कालावधी दि.०१ जानेवारी २०२४ ते दि. १५ फेब्रुवारी २०२४
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांचा शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदाधित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातुन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्शशाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. सहभागी शाळांना पुढील प्रमाणे पारितोषिकांची तरदुत शासन स्तरावरुन करण्यात आली आहे.
शासकिय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांचेसाठी व इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना स्वतंत्रपणे वरीलप्रमाणे पारितोषिकांची तरतूद आहे करिता सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सहभागी होण्याचे अवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय – छत्रपती संभाजीनगर मार्फत करण्यात येत आहे.