उन्हाची तीव्रता लक्षात घेता सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सकाळ सत्रात भरविणे बाबत change school time
संदर्भ 1) मा. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जा.क्र.
शिउर्स/औ/प्रावि-3/2022-23/697 दि.23/02/2024
2) या कार्यालयाचे पत्र जा.क्र.शिवि/कावि/1130/2024 दि.28/02/2024
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, मा.विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र दि.23/02/2024 अन्वये माहे फेब्रुवारी 2024 पासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नये व विद्यार्थी शिक्षकांचे आरोग्याचे होत लक्षात घेता दि.01/03/2024 पासून आपल्या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयास जोडून कनिष्ठ महाविद्यालय सकाळच्या सत्रात भरविणे बाबत संदर्भ क्र.2 अन्वये यापूर्वी सुचना दिलेल्या आहेत. परंतू काही शाळा दुपारच्या सत्रात भरवत असल्याचे आढळून आल्याचे तक्रारी कार्यालयास्क प्राप्त झाल्या असल्याने सदरील सुचना देण्यात येवून कळविण्यात येते की, यापुढे जर दुपारच्या सत्रात शाळा सुरु असल्याचे आढळून आल्यास योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.