आव्हानित मते; आव्हानित मत म्हणजे काय ? Challenged vote
• मतदाराच्या ओळखीबाबत मतदान प्रतिनिधी उमेदवार यांनी आक्षेप घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष यांनी पुढील कार्यवाही करावी-
आक्षेप घेणा-याकडून अनामत रक्कम रु.२/- घ्यावी व त्याची पावती द्यावी.
आक्षेपाची संक्षिप्त चौकशी करुन आक्षेप खरा आढळल्यास त्या व्यक्तीला मतदान
करण्यापासून रोखावे व लेखी तक्रार करुन पोलीसांच्या ताब्यात द्यावे. जर आक्षेप सिद्ध झाला नाही, तर त्या व्यक्तीस मतदान करु द्यावे.
आक्षेप क्षुल्लक आहे किंवा तो प्रामाणिकपणे घेतलेला नाही, असे वाटल्यास आक्षेप फी रु.२/- सरकार जमा करावी. अन्य बाबतीत ती संबंधितास परत करावी.