शिक्षकांना BIO कामातू वगळण्यात यावे याबाबत पत्र block level officers 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांना BIO कामातू वगळण्यात यावे याबाबत पत्र block level officers 

राज्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या निवडणूक कामांबाबत…

संदर्भःमुख्य निवडणूक आयोग यांचे कार्यालय पत्र क्रमांक ईएलआ 2024/प्रक्र.205/24/33 दि. 22 फेब्रुवारी 2024.

मा. महोदय,

उपरोक्त विषयान्वये, आपण दि.22 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षकांना BIO कामातू वगळण्यात यावे याबाबत पत्र बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई शहर व मुंबई उपनग जिल्हाधिकारी यासाठी काढले, परंतु महोदय मी या पत्राद्वारे आपणास अतिशय विनम्रपण निदर्शनास आणू इच्छितो की, शिक्षकांच्या बाबतीतील हा प्रश्न फक्त बृहन्मुंबई महानगरपालिका – मुंबई शहर व उपनगर येथे मर्यादित नसून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या बाबतीत आहे. आज एका एका शाळेमधील 90-90% शिक्षक शाळाबाह्य कामाच्या निमित्ताने व विशेषतः निवडणुकीच्य कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. जर हीच परिस्थिती राज्यातील सर्व जिल्ह्यांची असेल आणि यासाठी सर्वच जिल्ह्यातील शिक्षक शाळाबाह्य कामे देऊ नये यासाठी मागणी करत असतील तर फक्त एका जिल्ह्यासाठी ह निर्णय घेणे मला राज्यातील इतर शिक्षकांच्या दृष्टीने अन्यायकारक वाटतो.

तरी मी आपणास या पत्राद्वारे विनंती करतो की, आपण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्य बाबतीत दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याती जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सूचना द्याव्या की, त्यांनी कुठल्याही शाळाबाह्य कामासाठी किंव निवडणूक कामासाठी शिक्षकांना जबाबदारी न देता त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाब तातडीने परिपत्रक काढावे, ही विनंती.

राज्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या निवडणूक कामांबाबत पत्र येथे पहा

👉👉pdf download 

Leave a Comment