राज्यांतील सर्व शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत block level officer
राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळेतील शिक्षकांना बीएलओ कामातून वगळण्याबाबत
संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, संस्थापक, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव, नाशिक यांचे क्र. अभाऊशिसं/राका/२०२३/BI.०/१२३८, दि.०१.०५.२०२३
महोदय,
उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे. (सोबत प्रत संलग्न)
सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्यांबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास व शिक्षण आयुक्तालयास तात्काळ सादर करण्यात यावेत ही विनंती.
मतदान कामकाजातून शिक्षकांना वगळण्यात यावे. कारण विद्यार्थी गुणवत्ते वर याचा वाईट परिणाम होत आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे.