निष्काळजीपणा भोवणार; गटशिक्षणाधिकारी रडारवर block education officer
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील प्राथमिक
शिक्षकांचे मार्च, एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन झाले नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांनी प्रशासनावर दबाव वाढविला आहे. एवढेच नाहीतर, थेट उपसंचालकांपर्यंत हे प्रकरण गेल्याने त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर
शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावून कामात निष्काळजीपणा केल्याचे म्हटले आहे. शिक्षकांचे चुकीचे खातेक्रमांक देणे आता गटशिक्षणाधिकाऱ्यांना भोवणार असून, त्यांना २४ तासांच्या आत खुलासा सादर करावा लागणार आहे.
शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला करण्याचे शासन निर्देश आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे मार्च, एप्रिल महिन्यांपासून वेतन झाले नाही. एवढेच नाहीतर, फेब्रुवारी महिन्यातील वेतन इन्कम टॅक्स भरण्यामध्ये गेले आहे. त्यामुळे सध्या शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भात
शिक्षक संघटनांनी दबाव वाढविल
मागील दोन महिन्यांचे शिक्षकांचे वेतन झाले नाही. त्यातच फेब्रुवारी महिना इन्कम टॅक्समध्ये गेल्याने सध्या शिक्षकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी प्रशासनाला निवेदन देत दबाव वाढविला आहे.
संघटनांच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. दरम्यान, शिक्षण उपसंचालकांनीही याबाबत दखल घेतली असून, त्यांनी जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील चंद्रपूर, नागभीड, राजुरा, सिंदेवाही, भद्रावती, चिमूर, बल्लारपूर, पोंभूर्णा या
पंचायत गटशिक्षणाधिकाऱ्यांना बजावली आहे.
समितीच्या नोटीस
यामध्ये केलेल्या चुकीमुळे जिल्ह्यातील इतर शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचेही म्हटले आहे. कर्तव्यात कसूर करून आपले कर्तव्य सचोटीने न करता कामात निष्काळजीपणा करून शासन सेवाशर्तीचा भंग केल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अशी बजावली नोटीस
आपणाकडे दिलेली जबाबदारी आपण पूर्णपणे योग्य रीतीने पार न पाडता वारंवार सूचना देऊनही बँक खाते क्रमांक तपासणी न करता चुकीच्या खाते क्रमांकांसह देयके कार्यालयात सादर केली आहेत. आपण आपल्या कर्तव्यात कसूर करून आपले कर्तव्य सचोटीने न करता कामात निष्काळजीपणा करून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केला आहे. तेव्हा आपल्याविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ७ नुसार नोटीस बजावण्यात येत आहे.
कर्तव्यात केला कसूर
■ शिक्षकांच्या वेतनासाठी ई-कुबेर प्रणालीनुसार त्यांचे बँक खाते क्रमांक कोषागार कार्यालयाकडे सादर करावे लागते.
■ गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काही शिक्षकांचे दिलेले खाते क्रमांक चुकीचे दिले आहेत.
■ नव्या प्रणालीनुसार, एकाही शिक्षकाचा खाते क्रमांक चुकला तर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन होत नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहे.
■ याला सर्वस्वी गटशिक्षणाधिकारी जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.