जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर बालसंस्कार वर्गात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न balsanskar snehsammelan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
balsanskar snehsammelan 
balsanskar snehsammelan

जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर बालसंस्कार वर्गात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न balsanskar snehsammelan

मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे १ एप्रिल पासून बालसंस्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे . सदरच्या कार्यक्रमात विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले . मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते, उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ. सुनिता शिंदे, सौ मनिषा चव्हाण, डान्स प्रमुख काजल मदने, शिवानी खोमण यां सर्वांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . गणपती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली . बालवर्ग व नविन १ली मध्ये येणाऱ्या मुलांनी अलावा सुंदर, नाच रे मोरा या गीतावर छान डान्स केला . शाळेतील १ ते ४ च्या मुलांनी २५ गीतावर ठेका धरला . प्रामुख्याने शाळेच्या वतीने धार्मिक, प्रबोधन पर , लोकनृत्य, महाराष्ट्राची – लावणी नृत्य, नव्या जुन्या उडत्या चालीवरील गीतांची रेलचेल कार्यक्रमात दिसून आली .
दैवत छत्रपती या गीतावर छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची घोड्यावर लेझीम नृत्य करीत पब्लीक मधून मिरवणूक काढण्यात आली . संपूर्ण गीत सादरीकरणात घोडे स्टेजवर आल्याने अबालवृद्ध, पालक, ग्रामस्थांनी कौतूक केले .
नुकत्याच आयोध्येत राममंदीर स्थापना करण्यात आली असून ‘ मेरे घर राम आयेगे ‘ या गीतात राम, सिता, लक्ष्मण,हनुमान ही ड्रेपरी करून गीत सादरीकरण झाले , उपशिक्षीका सौ . मनिषा चव्हाण यांनी परिश्रम घेऊन हे गीत आयोजित केले होते . महीला वर्गाने उस्फूर्त प्रतिसाद दिला देशभक्तीपर गीत जलवा, इंदुरीकर कॉमेडी डान्स, झिंगाट, माझ्या पप्पांनी गणपती आणला . पावण जेवला काय, मी आहे कोळी, गोंधळ गीत, चाल तुरु तुरु, बाईपण भारी देवा, आपलीच हवा, गाडी घुंगराची,, केळवाली, जपून दांडा धर,, येऊ कशी कशी मी नांदायला, पुष्पा, झालो तुझ्या वर फिदा, आदी गीतांचे सादरीकरण १ ते ४ च्या मुलांनी केले .


शाळेने अतिशय कमी वेळेत छान प्रकारे आयोजन केले होते . विद्यार्थी पालक ग्रामस्थ पदाधिकारी सर्वांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला चांडाळ चौकडी कलाकार टीमने शाळेच्या या स्नेहसंमेलनात ११ हजार रुपयाचे पारितोषक दिले . त्याचबरोबर ग्रामस्थ पाल क सर्वांनी भरघोस मदत केली .
ग्रामस्थांच्या वतीने व चांडाळ चौकडी वेबसेरीज टीमच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांना सामाजिक कार्याबद्दल आदर्श पुरस्कार मिळाल्याने सपत्निक सत्कार करण्यात आला . त्याबरोबर सर्व शिक्षकांचा जोडीने सन्मान करण्यात आला .

सदर कार्यक्रमात अबॅकस प्रमुख सौ शितल भगत यांनी मुलांचे १ते४ मधील ३१ विद्यार्थी अबॅकस शिवाय गणिती क्रीया सादरीकर करून दाखवले पालकांनी मुलांच्या तयारी बद्दल कौतुक केले .


विद्यार्थी कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन दरवर्षी उत्कृष्ट सादरीकरण होत असते . कार्यक्रम आयोजित करून समाज प्रबोधनाचे कार्य शाळेच्या वतीने श्री ज्ञानदेव सस्ते , श्री रेवणनाथ सर्जे, सौ सुनिता शिंदे , सौ मनिषा चव्हाण यां सर्वांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रामाणिक प्रयत्न असतात त्यामुळे पालकांचा विश्वास संपादन केला असून दरवर्षी पट वाढ होत असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम होत असले बद्दल समस्य ग्रामस्थ कांबळेश्वर यांच्या वतीने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बदल शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या .

1 thought on “जि.प.प्राथ.शाळा कांबळेश्वर बालसंस्कार वर्गात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न balsanskar snehsammelan ”

Leave a Comment