जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर मध्ये बालसंस्कार वर्गात वैष्णवांची मांदियाळी balsanskar activity
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे १ एप्रिल पासून बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले असून मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते, उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे , सौ मनिषा चव्हाण या सर्वांच्या कल्पकतेतून अनेक उपक्रम राबविले जात आहेत .
कांबळेश्वर गावातील ग्रंथराज पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सांगता होती . गावातून पालखी सोहळा आयोजीत केला होता .शाळेमध्ये पालखी सोहळा आलेवर पालक, ग्राथस्थ, माता पालक, शिक्षक , विद्यार्थी सर्वांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम , भजन म्हणत फेर धरला . बालसंस्कार वर्गात मुलांना लोप पावत चाललेल्या जुन्या संस्कृतीचा वारसा जपण्याचा जणू संदेशच देण्यात आला . विद्यार्थी पालक शिक्षक सर्वांनी मृदुंग टाळावर फुगडीचा आनंद लुटला . केवळ पुस्तकी ज्ञानाने पिढी घडणार नसून त्याला आध्यात्मिक जोड देणे गरजेचे असून अशा जुन्या रुढी – परंपरा चालीरिती सध्याच्या पिढीला गरजेच्या असून लोप पावत चाललेल्या जुन्या आठवणी मुलांना विविध उपक्रमातून बालसंस्कार वर्गातून देण्याच प्रयत्न असतो .
पालखी सोहळ्यात १००% विद्यार्थी शिक्षक पालक -ग्रामस्था बरोबर सहभागी झाले . चांडाळ चौकडी वेबसिरीजचे प्रमुख कलाकार श्री भरत शिंदे यांच्या गोपाळकाल्याच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ विद्यार्थी शिक्षकांनी घेऊन गोपाळ काल्याच्या प्रसादाचा आस्वाद घेतला .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना शाळेमध्ये अनेक उपक्रम राबविले जातात . योग अभ्यास ,ध्यान धारणा, जुने खेळ, कॅरम ,बुद्धिबळ, क्रिकेट आदी उपक्रम बालसंस्कार वर्गात राबवले जातात आजचा आगळ्या वेगळ्या पालखी सोहळा सहभागातून मुलांच्या बालमनावर धार्मिक सांस्कृतिक मूल्ये रुजवण्याचे काम झाले असून पालक ,ग्रामस्थ , माता पालक या सर्वांनी शाळा सहभागाबद्दल कौतुक करून बालसंस्कार वर्गास शुभेच्छा दिल्या