समग्र शिक्षा अंतर्गत विशेष प्रशिक्षण उपक्रमातील (बालरक्षक सक्षमीकरण केंद्र स्तर प्रशिक्षण निधी वितरणाबाबत) balrakshak training 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 समग्र शिक्षा अंतर्गत विशेष प्रशिक्षण उपक्रमातील (बालरक्षक सक्षमीकरण केंद्र स्तर प्रशिक्षण निधी वितरणाबाबत) balrakshak training 

संदर्भ :- १) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे पत्र क्र. जा.क्र. मप्रशिप / स शि/शा.बा.मु./नस्तीक्र.१०/२०२३-२४/२२९५ दिनांक ०८/०८/२३

बालरक्षक शासन निर्णय येथे पहा

👉👉pdf download 

 

२) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे पत्र क्र. जा.क्र. मप्रशिप / स शि/शा.बा.मु./नस्तीक्र.१०/२०२३-२४/३३२० दिनांक ११/१२/२३

३) या कार्यालयांचे पत्र जा.क्र./रा. शै.सं.प्र.प/स.वि./. समग्र (OoSc) /२०२२ – २३/९६१ दिनांक २४/२/२३

उपरोक्त संदर्भ क्र.३ नुसार बालरक्षक सक्षमीकरण ऑनलाईन कार्यशाळेचे राज्यस्तरावरून आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रत्येक जिल्हयातून २-तज्ञ (समता विभाग प्रमुख व जिल्हा समन्वयक बालरक्षक) उपस्थित होते.

त्यानंतर तालुका स्तरीय ३ तज्ञ व्यक्तीना दोन दिवस प्रत्यक्ष (Face to Face) हे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर देण्यात आलेले होते. जिल्हा स्तरावर सद्यस्थितीत बालरक्षक सक्षमीकरण केंद्र स्तरीय प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. त्या अनुषंगाने केंद्र स्तरीय बालरक्षक दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्यात यावे. जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ञ बालरक्षकांनी केंद्रस्तरावर सदर प्रशिक्षण द्यावयाचे आहे. यानुसार तालुका निहाय केंद्रस्तर प्रशिक्षणाचे नियोजन करावे. प्रत्येक शाळेतून एका शिक्षकास केंद्रस्तरावर प्रशिक्षण देण्यात यावे. या दोन दिवसीय केंद्रस्तर प्रशिक्षणासाठी प्रस्तुत कार्यालयाकडून बालरक्षक घटक संच पुरविण्यात येणार आहे. सदर संच आपल्या मार्फत केंद्र स्तरावरील प्रशिक्षणार्थिना पुरविण्यात यावा.

केंद्र स्तरीय बालरक्षक प्रशिक्षणासाठी सोबतच्या निधी वितरण तक्त्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांना PFMS प्रणाली द्वारे जिल्यातील केंद्र सख्येनुसार प्रती केंद्र रु. ७४०/- प्रमाणे निधी वितरीत करण्यात येत आहे.

निधी विनियोगाबाबत सूचना पुढील प्रमाणे :

१ सदर उपक्रमाचा खर्च शासनाच्या वित्तीय नियमावली मधील तरतुदीनुसार करण्यात यावा.

२ उपक्रमाच्या प्रशिक्षणार्थ्यांची माहिती, नाव, पद, मोबाईल क्रमांक इत्यादीसह उपलब्ध असावी.

३ सदर निधी चहापान, साधन व्यक्तींचा प्रवासभत्ता यावर खर्च करावा.

४ केंद्र प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या कडे दिली आहे.

संख्येप्रमाणे रक्कम संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना Withdrawl Limit,PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आलेली आहे.

५ केंद्रस्तरावर प्रशिक्षणामध्ये उपस्थिती पत्रकामध्ये प्रशिक्षणार्थीचे पूर्ण नाव पदनाम, कार्यालय मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी दिनांक-निहाय उपस्थितीची स्वाक्षरी इत्यादी बाबींचा समावेश असावा.

६. केंद्रस्तरावरील प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती पत्रक, उपक्रमाची निवडक छायाचित्रे व २ते४ मिनिटांची ध्वनीचित्रफीत ) इत्यादी साहित्याचे संकलन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात यावे. या उपक्रमासाठी नियुक्त नोडल अधिकारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी सर्व अभिलेखांची एक लिंक तयार करून या कार्यालयास equitydept@maa.ac.in वर ई- मेल करावी.

७. प्रशिक्षण खर्च, अभिलेखे भविष्यकालीन लेखापरीक्षणासाठी आपल्या स्तरावर जतन करून ठेवण्यात यावेत.

८. केंद्रस्तरावरील प्रशिक्षण निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने संकलित करून जिल्हयाचे एकत्रित उपयोगिता प्रमाणपत्र प्रशिक्षण झाल्यानंतर दोन दिवसात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयास पाठवावे . विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.

९. केंद्रस्तरावर प्रशिक्षण २५ फेब्रुवारी २०२४ अखेर पर्यंत पूर्ण करण्यात यावे व दि.२५/०२/२०२४ पर्यंत उपयोगिता प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करावे.

Leave a Comment