राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत शुद्धिपत्रक्क ashwasit pragati yojna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत शुद्धिपत्रक्क ashwasit pragati yojna 

वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ (ब) (३) वगळण्याचे आणि परिच्छेद क्रमांक २ (क) (१) मध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. सदर प्रकरणी उपरोक्त नमूद शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

शासन शुद्धीपत्रक –

१. वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ (ब) (३) “विवक्षित सेवाकालावधीनंतर, संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचनेचा (Non functional pay structure) मंजूर करण्यात आलेला / येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल. उदा. मंत्रालय/विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतनसंरचना” हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात येत आहे.

२. तसेच, वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ (क) (१) मधील “तथापि, या योजनेतील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतनसंरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवक्षित सेवाकालावधीनंतर, त्या पदाच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल.” हे वाक्य वगळण्यात येत आहे.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२४०२२११८३६४६०००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन शुद्धिपत्रक येथे पहा

👉👉pdf download 

 

सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शासन निर्णयात सुधारणा

👉👉pdf download 

Leave a Comment