आपली सूर्यमाला बहुपर्यायी सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे apli suryamala general knowledge questions
आपली पृथ्वी आपली सूर्यमाला
१) आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात ?
खगोलीय वस्तू
२) ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना काय म्हणतात ?
तारे
३) सूर्य काय आहे ?
तारा
४) तारे कसे आहेत ?
स्वयंप्रकाशित
५) ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हणतात ?
ग्रह
६) ग्रह स्वताः भोवती फिरता फिरता कोणा भोवती फिरतात ?
ताऱ्याभोवती
७) आपल्या पृथ्वीला कोणापासून प्रकाश मिळतो ? ➡️सूर्यापासून
८) आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात ? 👉पृथ्वीचे परिभ्रमण
९) सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या सात ग्रहांची नावे सांगा. 👉बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून डी.
१०) प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो, त्या मार्गाला काय म्हणतात ? 👉ग्रहाची कक्षा
११ ) सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे काय सूर्याभोवती फिरण म्हणतात ?👉 सूर्यमाला
१२) काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना काय म्हणतात ?
👉उपग्रह
१३) चंद्र स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा
काय म्हणतात ? 👉उपग्रह
१४) नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान
आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना काय म्हणतात ? 👉बटुग्रह
१५) मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा
एक पट्टा आहे, त्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना काय म्हणतात ?
👉लघुग्रह
१६) सूर्यमालेत कशा कशाचा समावेश होतो ? 👉ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह
१७) खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतः कडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते, या शक्तीला काय म्हणतात ? 👉गुरुत्वाकर्षण शक्ती
१८) ग्रह, तारे यांमधील असणारी रिकामी जागा म्हणजे काय ? 👉अवकाश
१९) पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरूदध शक्ती दयावी लागते, त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास काय म्हणतात ?
👉अवकाश प्रक्षेपण तंत्र
२०) भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा लॉगफॉर्म काय ?
👉Indian Space Research Organization
२१) इस्त्रो मार्फत चंद्रावर कधी यान सोडले होते ? 👉२२ ऑक्टोबर २००८ डी.
२२) मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ? 👉मॉम
Mars Orbit Mission
२३) पहिले मंगलयान मंगळ ग्रहाभोवती कधी प्रस्थापित झाले ?
👉२४ सप्टेंबर २०१४
२४) अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी कशाचा उपयोग करतात ?
👉शक्तिशाली अग्निबाणांचा
२५) अवकाशयानातून वैज्ञानिक काही मोहिमांमध्ये जातात त्यांना काय म्हणतात ?
👉अंतराळवीर
२६) १९८४ साली कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात गेले ? 👉राकेश शर्मा
२७) भारतीय वंशाच्या कोणकोणत्या अंतराळवीर होत्या ?
👉कल्पना चावला, सुनीता विल्यम्स
२८) कृत्रिम उपग्रहांचा उपयोग कशासाठी केला जातो ? 👉पर्यावरणाचे निरिक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा
शोध घेणे, संदेशवहन करण्यासाठी