महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०२३. सन २०२३-२०२४ चे अनुदान वितरण घरबांधणी अग्रिम वितरीत करण्यात यावा anudan granted 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, २०२३. सन २०२३-२०२४ चे अनुदान वितरण घरबांधणी अग्रिम वितरीत करण्यात यावा anudan granted

. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला उपरोक्त निधी / अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून वितरीत करण्यात येत आहे :-

१) वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / शासन परिपत्रक यामधील विहित सूचना / अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम, १९५९ मधील परिशिष्ट-२६ मधील तरतूदी विचारात घेवून, संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रक्कमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरीत करण्यात यावा. यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी.

२) दिनांक ०१.०५.२००१ रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास (दुसऱ्या वेळेस जुळया अपत्यांचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.

३) ज्या उद्देशासाठी निधी / अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. तसेच इतर लेखाशिर्षांकडे वळती करता येणार नाही.

४) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास १० तारखेपर्यंत सादर करावा.

५) अनुदान वितरीत करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच वित्त विभाग शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र. ३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग-१, उपविभाग एक मधील अटी व शर्तीचे पालन करुन सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेवून अनुदान अदा करावे.

६) पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती / मंत्रीमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करावी.

पृष्ट १० पैकी ५

शासन निर्णय क्रमांकः अनुवि-४९२३/(५०/२३)/अर्थसंकल्प

७) खाजगी स्वंयसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करुन देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग-१, उपविभाग एक मधील अनुक्रमांक २७, नियम १४९ प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेवून अनुदान अदा करावे.

८) ज्या तरतूदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतूदी वितरीत करताना भाग-१, उपविभाग-तीन, अनुक्रमांक-चार, नियम २७ (२) अन्वये प्रदान केलेल्या

अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरीत करावे. ९) जिल्हा परिषदांसाठीचे वेतनेत्तर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरीत करु

नये.

१०) नवीन खर्चाच्या अनुषंगाने नवीन बाब प्रस्तावाव्दारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.

११) विविध शासकीय / प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहायक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांचेकडून पूर्वी वितरीत केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत. यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरीत करण्यात येऊ नये. कोषागार अधिकाऱ्यांनी, सहायक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाऊंट स्टेटमेंट (Bank

Account Statement) ची प्रत जोडलेली नसल्यास देयक पारित करु नये.

१२) शासनाव्दारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बैंक अकाऊंटमध्ये ECS व्दारे प्रदान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरीत्या व Offline पध्दतीने वितरीत करण्यात येऊ नये. १३) स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी सदर

संस्थांकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमांचा आढावा घेण्यात यावा व त्या रकमा वसूल करुनच उर्वरीत अनुदान वितरीत करण्यात यावे. तसेच शासनाव्दारे सदर संस्थांना वितरीत केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्याचे बँक अकाऊंट स्टेटमेंट (Bank Account Statement) शासनास सादर करावे. एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरीत करु नये.

१४) वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कार्यक्रमाअंतर्गतची लाभार्थ्यांची देयके आहरित करतांना लाभार्थ्यांची यादी निश्चित करुन योग्य त्या तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्यांची अनुदाने आहरित करण्यात येऊ नयेत. वैयक्तिक लाभार्थ्यांचे कार्यक्रम आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात यावे व अनुदानाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमनेच (ECS) व्दारेच करण्यात यावे. तसेच, वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यांसदर्भात वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२७/अर्थबळ, दिनांक ०८.०६.२०२२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली असल्याबाबत संबंधित विभागांनी खातरजमा करावी.

१५) शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती, वैयक्तिक लाभार्थी तसेच सवलती पोटी दिलेले अनुदान इत्यादींची प्रदाने, इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीम (ECS) व्दारेच करण्यात यावे.

१६) बांधकाम विषयक प्रस्तावासंदर्भात प्रशासकीय मान्यता / तांत्रिक मान्यता तसेच आवश्यक तेथे सचिव समितीची मान्यता प्राप्त करुन कामनिहाय निधी अर्थसंकल्पीत करणे आवश्यक आहे. नवीन कामांबाबत निधीच्या उपलब्धतेची खात्री केल्यांनतरच कामाची निविदा सूचना काढून कार्यारंभ आदेश देण्यात येऊन काम सुरु करावे व आवश्यकतेप्रमाणे निधीचे वितरण करण्यात यावे. जुन्या कामांचा आढावा घेऊन ती प्राथम्याने पूर्ण करण्यात यावीत व हा निधी ठेव बांधकामाचे स्वरुपात सार्वजनिक बांधकाम विभागास प्रदान करु नये.

१७) केंद्र पुरस्कृत योजनेसंदर्भात केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्याची खात्री संबंधित विभागाने वित्त विभागाच्या अर्थोपाय शाखेकडून करुन घ्यावी (यासाठी व्यय / अर्थसंकल्प शाखेला नस्ती संदर्भीत करण्याची आवश्यकता नाही) व तद्नंतर सदर निधी प्राप्त झाला असल्यास तसेच राज्य शासनाचा समरुप हिस्सा प्रशासकीय विभागाने त्यांचे स्तरावर वितरीत करावा. यासाठी नस्ती पुन्हा वित्त विभागास सहमतीसाठी वेगळयाने संदर्भीत करण्याची आवश्यक नाही. तथापि, वितरीत मर्यादेत निधी पुरेसा उपलब्ध नसल्यास नस्ती वित्त विभागाच्या अर्थसंकल्प शाखेस निधी वितरणासाठी सादर करावी. मात्र, मागील वर्षामधील केंद्र शासनाचा निधी चालू वर्षी खर्च करावयाचा असल्यास त्यास

आवश्यकतेप्रमाणे यथास्थिती नियोजन विभाग, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच वित्त विभागाची सहमती घेणे अनिवार्य राहील.

१८) “शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची नियमपुस्तिका”, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने त्यांच्या क्र. भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-।।/ उद्योग-४, दि. १.१२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये प्रसिध्द केली आहे. सदर शासन निर्णय व त्यासोबतच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तसेच, सदर विभागाने तद्नंतर वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रक यामधील सूचनांनुसार खरेदी प्रक्रीया पूर्ण करुन पुरवठादार निश्चित झाल्यानंतर तसेच या मार्गदर्शक सूचनेतील अटींचे पालन करुन खरेदीची देयके कोषागारातून आहरित करण्यात यावीत. खरेदी विषयक धनादेश संबंधित पुरवठादाराच्या नावाने व इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरन्स सिस्टीमव्दारे (ECS) अदा करण्यात यावेत.

१९) अनेक वेळेला विभागांव्दारे संक्षिप्त देयकाव्दारे निधी खर्च करण्यात येतो. मात्र त्याचे तपशीलवार देयक सादर न केल्यामुळे लेखा आक्षेप येतात व अपहार संभवतात. तरी यापुढे विभागांनी ज्या लेखाशीर्षाखाली जुनी तपशीलवार देयके प्रलंबित असतील ती सादर केल्याशिवाय त्या लेखाशिर्षाखालील निधी वित्त विभागाच्या सहमतीशिवाय आहरित करु नये.

२०) विविध कारणांमुळे अखर्चित राहिलेला निधी विभागांनी त्यांच्या अधिनस्त महामंडळाकडे हस्तांतरीत करुन तांत्रिकदृष्ट्या खर्च झाल्याचे दाखविले जाते, ही एक प्रकारची अनियमितता आहे, याची विभागांनी नोंद घ्यावी. तसेच त्यांच्या अधिनस्त असलेला यापूर्वीचा अखर्चित निधी (स्वीय प्रपंजी खात्यातील / महामंडळाच्या खात्यातील वा इतर प्रकारे खर्च दर्शवून बाहेर ठेवण्यात आलेला) संपूर्णतः खर्च झाल्याशिवाय तरतुदी आहरीत वा वितरीत करु नयेत. याठिकाणी असेही निदर्शनास आणण्यात येते की, स्वीय प्रपंजी लेख्याखाली विभागांकडे बऱ्यांच मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित असल्याचे दिसून येते. सदर निधीचा ताळमेळ घालून व लेखा परिक्षण करुन निधी विहीत मुदतीत खर्च न झाल्यास तो शासनाच्या तिजोरीत परत करण्यात यावा. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवलेला असल्यास त्याचे बैंक अकाऊंट (Bank Account Statement) शासनास सादर करावे.

पृष्ठ १० पैकी ७

शासन निर्णय क्रमांकः अनुवि-४९२३/(५०/२३)/अर्थसंकल्प

२१) थकित देयकांच्या प्रदानासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी केलेले साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्याचे लेखे सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय तो निधी आहरित करण्यात येऊ नये.

२२) उपरोक्त अटी व शर्ती बरोबरच खर्च करताना राज्य शासनाची कार्य नियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकेतील तरतूदी व सर्व अटी शर्तीचे पालन करणे आवश्यक राहील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका नियम १७ व नियम १४२, तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील उपविभाग-एक नियम क्र. १४९ आणि वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं २०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२ एप्रिल, २०२३, दिनांक ०८ डिसेंबर, २०२३, दिनांक ०५ फेब्रुवारी, २०२४ व दिनांक ०४ मार्च, २०२४, अनुक्रमांक १ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.३८४/व्यय-५, दिनांक १८ मार्च, २०२४, अनुक्रमांक २ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.३८९/व्यय-५, दिनांक १८ मार्च, २०२४, अनुक्रमांक ३ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.५४९/व्यय-५, दिनांक ०२ जून, २०२३, अनुक्रमांक ४ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.५८/व्यय-५, दिनांक १७ जानेवारी, २०२४ व अनुक्रमांक ५ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.३८३/व्यय-५, दिनांक १८ मार्च, २०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०३२२१३१४०७४०२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय pdf download

Leave a Comment