जि.प.शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद; नवीन भरती झालेल्यांना ‘या’ दिवशी नेमणुका तर पुढची नवीन भरती २० मेनंतर antar jilha Badli ban 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
antar jilha Badli ban
antar jilha Badli ban

जि.प.शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद; नवीन भरती झालेल्यांना ‘या’ दिवशी नेमणुका तर पुढची नवीन भरती २० मेनंतर antar jilha Badli ban

सोलापूर जिल्हा परिषद :जिल्हा परिषदेचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 11 हजार 85 शिक्षकांची भरती पार पडली आहे त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते मुळे त्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत.

👉या शासन निर्णयानुसार आंतर जिल्हाबदली कायमची बंद तो शासन निर्णय येथे पहा pdf download 

आता त्याला शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्यने कागदपत्रांची पडताळणी होऊन त्यांना लवकरच ऑर्डर मिळतील मात्र आता भरती झालेल्या शिक्षकांना पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही एका जिल्ह्यात त्यांना सेवानिवृत्त होईपर्यंत सेवा करावी लागणार आहे.

ग्रामविकास विभागाने काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवली आहे पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या शिक्षकांना सोड जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी सोडण्यात आलेले नाही आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना कार्यमुक्ती करण्यात येणार आहे पण आंतरजिल्हा बदलीची ही शेवटची प्रक्रिया असणार आहे नव्याने होणाऱ्या भरती मध्ये शिक्षकांना निवृत्त होईपर्यंत त्याच जिल्ह्यामध्ये राहावे लागणार आहे याच जिल्ह्यामध्ये काम करावे लागत असल्याचे लेखी द्यावे लागणार आहे इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील शिक्षक नव्याने निवड होऊन इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या वर्गासाठी गेला तर त्यास बाहेरील जिल्ह्यात जाण्यास परवानगी असणार आहे मात्र एकदा भरती झालेला शिक्षक त्याच पदावर काही वर्षांनी पुन्हा सहज जिल्ह्यात जाणार नाही किंवा त्याला जाता येणार नाही शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच त्यासंदर्भात देखील शासन निर्णय काढलेला आहे.

निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर नवीन भरतीला सुरुवात केली जाणार आहे

राज्यातील जिल्हा परिषदांमधील जवळपास 5000 पदे तर खाजगी अनुदानित संस्थांमधील 4000 शिक्षकांची भरती प्रक्रिया ही निवडणुकीचा शेवटचा टप्पा झाल्यानंतर म्हणजे 20 मे पासून सुरू करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आलेले आहेत जाहीर झालेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सुरू करायला परवानगी मिळावी अशी मागणी  शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती .

त्याला निवडणूक आयोगाने होकार दिल्यानंतर आता त्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले त्यादरम्यान मागील भरती वेळी चार उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा नव्याने पुढच्या भरतीसाठी अर्ज करावा लागणार नाही असे देखील सुचित करण्यात आलेले आहेत.

अगोदर बदली होणार आहे त्यानंतर पदोन्नती आणि त्यानंतर नव्याने पदस्थापना देण्यात येणार आहेत

जिल्हा परिषद शाळांमधील बदलीस पात्र शिक्षकांची पदस्थापना व पदोन्नतीची प्रक्रिया सुरुवातीला करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही प्रक्रिया पार पडेल त्यानंतर शाळा सुरू होण्यापूर्वी नव्याने भरती झालेल्यांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना नवीन ठिकाणी  पदस्थापना देण्यात येणार आहे

Leave a Comment