४० हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले; गुरुजींवर झाली कारवाई adhar updation 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

४० हजार विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले; गुरुजींवर झाली कारवाई adhar updation 

Adhar updation पटसंख्येअभावी शिक्षकांची मान्यता रद्द : पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक: तांत्रिक अडचणी आणि पालकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील तब्चल ३६ हजार ९२३ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण रखडले आहे.

यामुळे शाळेतील अधिकृत पटसंख्येवर परिणाम झाला असून, जिल्ह्यातील काही शाळांमधील शिक्षकांची मान्यता रद्द झाली आहे.

ADHAAR updation सुमारे ४० हजार विद्यार्थी बाकी

२३ हजार ३०८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरविण्यात आले आहेत

तर १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची प्रक्रिया अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे.

विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने शाळांच्या संचमान्यतेला ब्रेक लागला आहे.

विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्तीसाठी, मोफत पुस्तके गणवेश यासह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड नोंदणी सक्तीची आहे.

शाळांच्या संचमान्यता, पटसंख्येसाठी आधार ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे शिक्षण विभागानेही पुढाकार घेतला आहे.

Adhar updation १२ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण

जिल्ह्यातील विद्याथ्यपिंकी सुमारे ११ लाख ६४ हजार ३२० विद्याथ्यांची आधार नोंदणी पूर्ण झाली आहे.

मात्र, ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झालेली नसल्याने शाळांसह शिक्षकांच्या मान्यतेलाही अडचणी येत आहेत.

जिल्ह्यात १२ लाख ९८ हजार १८० विद्यार्थी विविध शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांत शिक्षण घेत आहेत.

त्यापैकी १२ लाख २१ हजार ४५१ विद्याथ्यांचे आधार कार्ड वैध तर २३ हजार ३०८ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध आहे.

१६ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

Adhar updation नोंदणीसाठी प्रयत्न

विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शालेय स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.

९५ टक्के आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उरलेले ५ टक्केही लवकरच पूर्ण करण्यात येईल.

– नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, नाशिक

विद्याथ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून देण्याबरोबरच वेळेत नोंदणी केल्यास विद्याथ्यांनाही शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो.

शासनानेही मुख्याध्यापकांवर विश्वास ठेवावा.

– एस.बी. देशमुख, सचिव, मुख्याध्यापक संघ

या कारणांमुळे रखडले

Adhar updation प्रमाणीकरण

• प्राथमिकच्या पहिली अधवा दुसरीच्या अनेक विद्याथ्यांच्या बोटांचे ठसे नोंदविले जात नसल्याने त्यांचे आधार कार्ड तयार होण्यास अडचण येत आहे.

• काही विद्यार्थ्यांच्या जन्मदाखल्यासह इतर कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांच्या आधार कार्डचा प्रश्न निर्माण होतो.

नाव दुरुस्तीनंतर अनेक विद्याथ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दिसून येत आहेत.

 

Adhar updation
Adhar updation

Leave a Comment