अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणेबाबत additional teacher samayojan
संदर्भ : १
. ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. जिपब/५११/प्र.क्र.५४/आ.१४/दि.१८.०५.२०११
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. पी.टी.आर/१११३/(०१/२०१३) एसएम-४/दि.१३.१२.२०१३
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन२०१५/प्रक्र-१६/१५/टीएनटी२/दि.२८.०८.२०१५
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन२०१५/प्रक्र-१६/१५/टीएनटी२/दि.०८.०१.२०१६
५. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर यांच्या दि. ०९.०३.२०२४ रोजी दिलेल्या समक्ष सूचनेनुसार
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सन २०२२-२०२३ सेवकसंचानुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत त्या शिक्षकांचे दि. सोमवार दि. ११.०३.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता तालुकास्तरावर संदर्भिय शासन निर्णयानुसार समायोजन करुन जी पदे रिक्त राहतील, त्या रिक्त पदांचा तसेच तालुका समायोजनात ज्या शिक्षकांचे समायोजन होणार नाही अशा शिक्षकांच्या आवश्यक तपशिलासह अहवाल या कार्यालयास त्याच दिवशी दु. ३.०० वाजेपर्यंत खासदुतामार्फत सादर करावा.
तालुका स्तरावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना आपल्या तालुक्यातील केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी कोणताही अतिरिक्त शिक्षक कार्यरत राहणार नाही याची खात्री करावी. आपण स्वतःही याबाबत यादृच्छिकपणे (Random) काही शाळांची तपासणी करावी. यामध्ये एकही अतिरिक्त शिक्षक राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हास्तरावरुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
खातेप्रमुख, गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी हे प्रत्येक तालुक्यातील काही शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करणार असल्याने या विषयाची पूर्ण दक्षता घ्यावी. कारण भेटीदरम्यान अतिरिक्त शिक्षक आढळल्यास आपणास जबाबदार धरण्यात येईल तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना कोणत्याही परिस्थितीत समानीकरणातील शाळा दाखविली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर समायोजन प्रक्रियेसाठी गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन तात्काळ कार्यवाही करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर यांचे निर्देश आहेत.
तसेच उदया दि. १०.०३.२०२४ रोजी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कामकाजाच्या पूर्वनियोजनासाठी कार्यालय सुरु ठेवावे. सदरचा अहवाल वेळेत सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.
जिल्हा परिषदचे पत्र येथे पहा pdf download