इ.3 री ते 12 वीचा अभ्यासक्रम बदलणार; राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाचा मसुदा नागरिकांसाठी खुला change curriculum
प्रसिद्धी निवेदन-इ.३ री ते १२ वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक. २३/०५/२०२४ पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक. ०३/०६/२०२४ पर्यंत खालील लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल नं. इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, यांचा समावेश असावा.
टीप: पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून, वरील पत्त्यावर पाठवावेत.
अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दिनांक २३/०५/२०२४ ते ०३/०६/२०२४
अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK https://forms.gle/TDHL9z8harzRgJoy5
यावर्षी अभ्यासक्रमात बदल करू नये