मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे प्रगणकांचे मानधन न मिळाल्याबाबत sarvekshan mandhan
संदर्भ :- शिक्षक संघटना समन्वय समिती, अमरावती यांचे निवेदन, दिनांक २१.०५.२०२४
महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने सादर करण्यात येते की, मराठा आरक्षणाकरीता MSBCC ने नेमून दिलेले सर्वेक्षणाचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण केलेले आहे. या कामाकरीता प्रगणकांना मानधन देण्यात येईल असे आयोगाकडून घोषित करण्यात आले होते, परंतू अद्यापही अमरावती जिल्ह्यातील प्रगणकांना ते मिळाले नाही. इतर जिल्ह्यामध्ये उदा. जालना मानधन मिळाल्याचे वर्तमानपत्रामधून कळाले असून, वरील बाबींचा सहानुभूती पूर्वक विचार करून अमरावती जिल्ह्यातील प्रगणकांचे लवकरात लवकर मानधन अदा करण्यात यावे असे संदर्भिय निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे.
त्याअनुषंगाने सदर निवेदन पुढिल कार्यवाहीस्तव सविनय सादर करण्यात येत आहे.