जि.प.प्राथ शाळांमध्ये आहार शिजवून देण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत असल्याबाबत mid day meal
राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत
संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७. दिनांक ३१/१०/२०२३.
२. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३-२४/ ०३२१७, दिनांक २२/०४/२०२४.
३. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३-२४/
०३३८० दिनांक:-३०/०४/२०२४
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत संदर्भिय क्र. १ च्या शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यातील दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्याचे निर्देश संदर्भिय पत्रान्वये आपणांस दिलेले आहेत. आपल्या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील काही शाळांमध्ये आहार शिजवून देण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
आपल्या जिलह्यातील दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याकरीता योग्य ती कार्यवही करण्यात यावी.