शिक्षकांना मतदानापासून वंचित का ठेवले? आयोगाची विचारणा- जिल्हाधिकाऱ्यांना मागितला ‘क्विक रिस्पॉन्स’ : उत्तर देण्याचे आदेश prahar shikshak sanghatna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांना मतदानापासून वंचित का ठेवले? आयोगाची विचारणा– जिल्हाधिकाऱ्यांना मागितला ‘क्विक रिस्पॉन्स’ : उत्तर देण्याचे आदेश prahar shikshak sanghatna 

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा (अमरावती) अमरावती मतदारसंघाची लोकसभा – निवडणूक पार पाडण्यासाठी कर्तव्यावर असलेले ४५० ते ५०० शिक्षक मतदानापासून वंचित राहिले आहेत. या गंभीरप्रकरणी – प्रहार शिक्षक संघटनेतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक – आयोगाने १८ मे रोजी ई-मेलद्वारे नोटीस बजावून याप्रकरणी – तत्काळ उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

अमरावती लोकसभा मतदान प्रक्रियेत कर्तव्यावर असलेले – ४५० ते ५०० शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित – राहिल्याची गंभीर बाब प्रथम एका निवेदनाद्वारे – जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आली होती. मात्र, या प्रकाराची कुठलीही दखल घेतली गेली नाही. वंचित शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी ‘क्विक रिस्पॉन्स’ मागितल्याचे म्हटले आहे. उत्तर प्राप्त होईस्तोवर प्रतीक्षा करण्याची विनंती केली आहे. न्याय मिळेल असा विश्वास आहे. – महेश ठाकरे, राज्य अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना

आयोगाकडून दखल

केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून, तत्काळ उत्तर दाखल करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना एका नोटिसीद्वारे दिले आहेत. याबाबतचा ई-मेल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांना शनिवारी प्राप्त झाला.

काय होती तक्रार?

अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये कर्तव्यावर असलेले साडेचारशे ते पाचशे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मतदानाकरिता १२-अ व १२ हे अर्ज भरून दिलेले होते. मात्र, तरीसुद्धा मतदान कर्तव्यावर असताना कर्मचारी व शिक्षकांना पोस्टल बॅलेट व इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट उपलब्ध न झाल्याने, तसेच याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल न घेतल्याने कर्मचारी व शिक्षक मतदानापासून वंचित राहिले आहेत. याबाबतची शिक्षक व कर्मचाऱ्यांची सविस्तर यादी तक्रारीसोबत निवडणूक आयोगाला देण्यात आली होती.

prahar shikshak sanghatna
prahar shikshak sanghatna

Leave a Comment