मनपा कर्मचाऱ्याचा मतदान केंद्रावर हृदयविकाराने मृत्यू चाळीसगावातील घटना; मधुमेह, बीपीचा होता त्रास on election duty 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनपा कर्मचाऱ्याचा मतदान केंद्रावर हृदयविकाराने मृत्यू चाळीसगावातील घटना; मधुमेह, बीपीचा होता त्रास on election duty 

प्रतिनिधी | जळगाव जोशी पेठ येथील रहिवासी तथा महानगरपालिकेतील वसुली विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला चाळीसगाव शहरातील मतदान केंद्रावर ड्युटी देण्यात आली होती. रविवारी १२ मे रोजी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. संजय भगवान चौधरी (वय ५३,)

रा.जोशी पेठ, जळगाव) असे मयत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

चौधरी हे जळगाव शहरातील जोशी पेठेत पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांच्यासह राहत होते. महानगरपालिका येथे गेल्या ३० वर्षापासून ते नोकरीला होते. सध्या वसुली विभागात कार्यरत होते. जळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना चाळीसगाव शहरातील तेहजीब उर्दू प्रायमरी स्कूल केंद्र क्रमांक १९१ या ठिकाणी त्यांना इलेक्शन ड्युटी दिली होती. तेथे रविवारी रात्री ११ वाजेला त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा जोरात झटका आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

on election duty 
on election duty

Leave a Comment