इ.1 ली ते १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण योजना प्रस्ताव अनुदानाबाबत शासन निर्णय class 1st to free education

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.1 ली ते १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण योजना प्रस्ताव अनुदानाबाबत शासन निर्णय class 1st to free education

10th लेखाशिर्ष-२२०२३०५६ या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची व अनुदान मागणीची कार्यपध्दती.

शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी/१०९६/प्र.क्र.१९७८/९६/साशि-५ दिनांक १३ जून १९९६ अन्वये १९९६-९७ पासून शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे. किमान १५ वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य असणा-या पालकांच्या पाल्यांना ही सवलत मिळू शकते.. या सवलतीसाठी ७५ टक्के उपस्थिती व चांगली वर्तणुक असणे आवश्यक असून अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सदरची सवलत त्या वर्षापुरती रोखण्यात येईल. मात्र तो विद्यार्थी उत्तीर्ण होताच ही सवलत पुढील वर्षात पूर्ववत चालू होत असते.

इयत्ता १० वी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण लेखाशिर्ष-२२०२३०५६ या शैक्षणिक यवलत योजनेचा लाभ हा लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व सदर योजनेबाबत संपूर्ण राज्यात एकसुत्रि पणा रहावा या करीता या योजनेबाबतची लाभार्थ्यांपासून ते संचालनायपर्यंतची करावयाची कार्यवाही/कार्यपध्दती खालीलप्रमाणे विहित नमुन्यात सादर करण्यात येत आहे.

सोबतः-

१) सदर शैक्षणिक सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पालकांनी मुख्याध्यापक/प्राचार्य यांचेकडे करावयाच्या अर्जाचा नमूना प्रपत्र-१

२) शिक्षण संस्थेच्या प्रमुखांनी /मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी भरावयाचा नमूनाः प्रपत्र-२

३) शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (योजना) यांचे कार्यालयात सादर करावयाचा मागणीचा नमूना प्रपत्रः-३

४) मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांचेकडे सादर करावयाचा बिल फॉर्म नमूना प्रपत्र-४

५) राज्यातील अशासकीय माध्यमिक शाळांतील, उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तसेच शासकीय अध्यापक महाविद्यलयातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण सर्व स्तरावर (इ. १ ली ते पदव्युतर स्तर) विहित दराने अर्थसहाय. २) प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना सर्व स्तरावर (इ. १ ली ते पदव्युतर स्तर) विहित दराने अर्थसहाय, फ्लो चार्ट (कार्यपध्दती) प्रपत्र-५

६) शिक्षणाधिकारी (योजना) जि.प. यांनी चारमाही अंदाजपत्रकावेळी अनुदान मागणी सादर करावयाचे नमूने

-प्रपत्र-अ,ब,क,ड.ई

सोबतः विहित नमूने जोडले आहेत.

class 1st to free education
class 1st to free education

Leave a Comment