जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.
– 1) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांकः जिपच-4820/ प्र.क्र.290/ आस्था-14 दि.07/04/2021
2) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय, क्र. संकिर्ण-2023/174/टीएनटी-1 दि.21/06/2023
3) मा.उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई शासन पत्र संकिर्ण-
2023/प्र.क्र.174/टीएनटी-1 दि.21/06/2023 4) मा.उप सचिव ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई शासन पत्र संकिर्ण- 2024/प्र.क्र.45/आस्था-14 दि.11/03/2024
5) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सोो. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गट शिक्षणाधिकारी व जिल्हातील मान्यताप्राप्त शिक्षक संघटना यांचे प्रमुख प्रतिनिधी यांची सहविचार सभा दि.१४/०३/२०२४ रोजी
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णय क्र.02 मधील मुद्या क्र.02 नुसार जिल्हातंर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासुन कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पा नुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. असे निर्देश आहेत.
संदर्भ क्रमांक 03 व 04 नुसार संदर्भ क्रमांक 02 च्या शासन निर्णयनुसार आवश्यक तो कार्यवाही करण्यात यावी असे कळविले आहे. तसेच संदर्भ क्र. 5 अन्वये लोकसभा निवडणूक 2024 बाबत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हातंर्गत
बदली प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त संदर्भिये आदेशानुसार कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक असल्याने आपले गटातील
बदली इच्छुक शिक्षकांचे सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील विनंती बदलीचे अर्ज दिनांक 14/05/2024 ते दिनांक
16/05/2024 अखेरीस आपल्या कार्यालयात सादर करण्याबाबत सर्व शिक्षकांना सुचित करावे त्यानुसार दिलेल्या विहीत नमुन्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या प्रकारचा विनंती अर्ज स्विकारण्यात येऊ नये तसेच संबधित अर्जदारानी विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 अंतर्गत विनंती अर्ज सादर केला असल्यास त्याबाबतचा पूरावा/ दाखले/प्रमाणपत्र यांची झेरॉक्स प्रत सोबत असणे आवश्यक राहिल याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे. सदर प्रक्रियेसाठी विशेष संवर्ग भाग-1, 2, 3, व 4 साठी पात्रता निकष हे संदर्भ क्र.। च्या शासन निर्णयातील तरतूदी नुसार आवश्यक असतील. बदली इच्छुक पात्र शिक्षकांना विनंती अर्ज सादर करण्याबाबत आदेशित करतांना पात्रता विषयक पुढील बाबी विचारात घ्याव्यात व त्यानुसारच
अर्ज स्विकारले जावे
1. विशेष संवर्ग भाग-1 सदर संवर्गातंर्गत वय वर्षे 53 पूर्ण करिता संदर्भ दिनांक 30/06/2024 राहिल या व्यतिरिक्त संदर्भ क्र.1 च्या शासन निर्णयात नमूद पात्रता निकष लागू राहतील. सध्या कार्यरत शाळेतील सलगसेवा दिनांक 30/06/2024 रोजी 3 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल.
2. विशेष संवर्ग भाग-2 सदर संवर्गातंर्गत दोन्ही कर्मचारी एकाच जिल्हयात कार्यरत असणे आवश्यक असेल तसेच दोन्ही कर्मचारी यांच्या कार्यालयातील अंतर 30 कि.मी. पेक्षा जास्त असेल. सध्या कार्यरत शाळेतील सलगसेवा दिनांक 30/06/2024 रोजी 3 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल. सदर निकष पूर्ण करणा-या पती पत्नी यापैकी एक शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असल्यास अशा शिक्षकांना सदर संवर्गात पात्र गणन्यात येईल. 3. विशेष संवर्ग भाग-3 सध्या कार्यरत असलेल्या अवघड क्षेत्रातील सलगसेवा दिनांक 30/06/2024 रोजी 3 वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असणे अनिवार्य असेल,
4. संवर्ग-4 सध्या कार्यरत असलेल्या सर्वसाधारण क्षेत्रातील सलगसेवा 10 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त व सध्या कार्यरत असलेल्या शाळेतील सलग सेवा 5 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त (दिनांक 30/06/2024 रोजी) असणे अनिवार्य असेल.
5. ज्या शिक्षकांच्या बदली प्रकियेबाबत मा. उच्च न्यायलयात न्यायालयीन प्रकरणे सुरु आहेत असे शिक्षक सदर प्रक्रियेसाठी पात्र असणार नाही. मात्र मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (परवानगी नुसार) अशा शिक्षकांचा समावेश सदर प्रक्रियेत करण्यात येईल.
6. जिल्हयातील सर्व गटांचे संकलित अहवाल प्राप्त झाल्यानंतर बदली पात्र शिक्षकांची अंतरिम यादी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने प्रसिध्द करण्यात येईल. सदर यादी प्रसिध्द केल्यानंतर यादीतील शिक्षकांच्या पात्रतेबाबत हरकत आक्षेप नोंदविणे करता दोन दिवसांचा कालावधी देण्यात येईल. तसेच या दरम्यान दिनांक 30/06/2024 रोजीची तालुका निहाय / पदनिहाय / माध्यम निहाय रिक्त पदांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. रिक्त पदांची यादी व अंतरिम यादी प्रसिध्द केल्यानंतर अर्ज केलेल्या शिक्षकांपैकी जर एखादया शिक्षकांस अर्ज मागे घ्यावयाचा असल्यास गटशिक्षणाधिकारी यांचेकडे संबधितानी विनंती अर्ज सादर करावे. अशा प्रकारे प्राप्त विनंत अर्ज व प्राप्त हरकती व आक्षेप यांची तपासणी करुन बदली पात्र शिक्षकांची अंतिम यादी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने प्रसिध्द करण्यात येईल.
7. अंतिम यादीत पात्र ठरलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्र.। मध्ये नमूद तरतूदी नुसार टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येईल. याप्रक्रियेसाठी जिल्हयातील दिनांक 30/06/2024 अखेरची सर्व रिक्त पदे समुपदेशन प्रक्रियेअंतर्गत समाविष्ठ करण्यात येतिल. मात्र समतोल तत्वानुसार जिल्हास्तरीय रिक्त पदांच्या प्रमाणात गटातील पदसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्यागटातील रिक्त पदे भरली जाणार नाही. तसेच प्रत्येक टप्प्याचीबदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या टप्प्यातील रिक्त जागा पुढील बदली टप्प्यातील शिक्षकांन साठी उपलब्ध करुन देण्यात येतिल. यानुसार संपूर्ण बदली प्रक्रिया समूपदेशन पध्दतीने पूर्ण करण्यात येईल. उपरोक्त नमूद पात्रता निकष धारण करणा-या आपल्या गटातील बदली इच्छुक शिक्षकांचे प्राप्त सर्व विनंती अर्ज
आपले स्तरावरुन संकलित करुन त्यांचा एकत्रित अहवाल यादीसह या कार्यालयास दिनांक 21/05/2024 रोजी सादर करावा. तसेच यापूर्वी ज्या प्राथमिक शिक्षकांनी परस्पर या कार्यालयात विनंती बदलीसाठी अर्ज सादर केले आहेत ते विचारात घेण्यात येणार नसल्याबाबत कळविण्यात यावे,
अचूक माहिती सोबत सादर करावी. सोबतः- विनंती बदलीसाठीचा अर्ज नमुना व
तसेच दिनांक 30/06/2024 अखेर शिक्षकांची शाळा निहाय / पटसंख्येनिहाय मंजूर /कार्यरत / रिक्त पदांची
संकलित अहवाल नमुना (एक्सेल फाईल)
BHADLI HAVI DARNI AWGHAD SEHTR2019-2024