ज्यांनी मारली दांडी, त्यांच्या उडणार दांड्या!निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले निलंबनाचे निर्देश on election duty traning
लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा
मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होऊ घातले आहे. याअनुषंगाने मतदान केंद्र अधिकारी व सहायक कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यांत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या दोन्ही प्रशिक्षणांना काही जणांनी दांडी मारली होती. त्यांची अनुपस्थिती नोंदवून घेतल्यानंतर आता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यांना निलंबित करण्याचे निर्देश नोडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात एकूण १५०३ मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांवर केंद्र अधिकारी तसेच सहायक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही जवळपास निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यांमध्ये प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. बहुतांश अधिकारी, कर्मचारी या प्रशिक्षणाला हजर होते.
मात्र, काहींनी या प्रशिक्षणाला दांडी मारली आहे. जे अधिकारी व कर्मचारी दोन्ही प्रशिक्षणांना गैरहजर राहिले, त्यांची यादी तयार करून संबंधितांनी कर्तव्यात कसूर
अर्ज दिला म्हणून मारली दांडी…
• प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांपैकी अनेकांनी आजारपण, गंभीर कारणे देऊन इलेक्शन ड्युटी कॅन्सल करून घेण्यासाठी अर्ज केला होता.
तो मान्य झाला किंवा नाही, याची खात्री न करताच प्रशिक्षण घेणे टाळले. त्याची शिक्षा त्यांना निलंबनाच्या स्वरूपात मिळेल.
अनुपस्थितांची माहिती; संकलन सुरू…
मतदान केंद्र अधिकारी व सहायक कर्मचाऱ्यांसाठी दोन टप्प्यामध्ये त्या-त्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी प्रशिक्षण सत्र घेण्यात आले होते.
• या दोन्ही वेळा ज्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली त्या सर्वांची माहिती संकलित केली जात आहे.
केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन आदेश काढण्याचे निर्देश डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले आहेत. यामुळे राष्ट्रीय कर्तव्यात हयगय करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुन्हाड कोसळणार आहे.