डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत जि.प.प्राथ शाळा कांबळेश्वर शाळेचे यश diamond talent search exam
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेने विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला होता . त्यामध्ये प्रामुख्याने मंथन , ऑलिम्पियाड, MTS, Itse अशा विविध परीक्षांत राज्य जिल्हा स्तरावर शाळेचे विद्यार्थी यशस्वी झाले असून डायमंड सर्च परीक्षेत इ. २ री मधील श्रीतेज निलेश चव्हाण आणि इ ४ थी मधील आराध्या विनोद गायकवाड यांनी यश मिळवले .
मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे , उपशिक्षिका सौ सुनिता शिंदे सौ मनिषा चव्हाण शाळेतील सर्वांनी ग्रामिण भागतील मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,,संधी मिळऊन देण्याचे काम माता पालकांना विश्वासात घेऊन वर्षभर सातत्य राखू न शैक्षणिक गुणवत्तेवर भर दिला असून १००% मुलांना पालक मात्रणीवरून विविध परीक्षा मधून शाळेतील विद्यार्थी चमकत असून विद्यार्थी पालकांत जिल्हा परिषद शाळेवरील मातृभाषेतील शिक्षणा शिवाय पर्याय नाही ही बाब पालवांच्या गळी उतरवण्यात शिक्षकांना यश आले असून याचाच परिपाक म्हणजे अनेक विद्यार्थी इंग्रजी / खाजगी माध्यमातून शाळेत दाखल होत असून मोफत व दर्जेदार जिल्हा परिषद शिक्षणाचा लाभ पालकांना मिळत आहे . शिक्षणात ‘शिकणे वा अध्ययन’ आणि ‘शिकवणे वा अध्यापन’ या एकमेकांच्या पूरक गोष्टी आहेत . बालक लहान वयात बऱ्याच गोष्टी पाहुन, हाताळून, ऐकुन शिकत असले तरी गुरुशिवाय ज्ञान अधुरे राहु नये म्हणुन त्याला शाळेत घातले जाते लहान वयातच बालकांच्या शिक्षणाचा पाया रचला जात असल्यामुळे मुलांना सहज कळेल, ती मुले न कंटाळता शिकण्याचा आनंद घेतील असे अध्यापन करणे ही शिक्षकांची महत्वाची जबाबदारी व कर्तव्य आहे.
1)लहान मुलांना आपलेसे करणे व त्यांना सहजतेने शिकवणे त्यांना अभ्यासाविषयी आवड निर्माण करून आनंदात अभ्यास करायला लावणे याची जबाबदारी शिक्षकावर असते.
2)जेथे मुले शिकतात तेथील वातावरण स्वच्छ, सुरक्षीत व सुशोभित ठेवले तर मुले शिकण्यात रमतात नाहीतर अस्वच्छ कोंदट जागेन कंटाळतात याचीही जाणिव शिक्षकांना असायला हवी.
3)लहान वयातील मुलांचे सुरवातीचे शिक्षण मातृभाषेतुन केले तर त्यांना शिकवलेले कळणे सोपे जाते याचा आग्रह शिक्षकांनी धरायला हवा, त्याचबरोबर इंग्रजी शिकले तरी चालेल.
4) मुलांना सहज सोप्या शिक्षणातून अवघड शिक्षणाकडे घेऊन जाणे हि शिक्षकांची महत्वाची जबाबदारी आहे.
5)अध्यापन शास्त्राप्रमाणे शिक्षकांनी आपली अध्यापनाची जबाबदारी कमी करत त्यातुन मुलांना स्वयंअध्ययनाकडे वळवणे गरजेचे आहे. त्यासाठी शैक्षणिक प्रयोग म्हणून DTSE- Diamond Talent search Examination हा प्रकल्प सामाजिक, शासकिय संस्थांच्या मदतिने राबवला जात आहे. अगदी सोप्या भाषेत मुलांना अभ्यास देऊन त्यांच्या मनातील परिक्षेची भीती काढून टाकणे व मुलांना स्वयंअध्ययनाची सवय लावणे हा या शैक्षणिक प्रयोगाचा उद्देश आहे.
शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल पालक ग्रामस्थ यांनी शाळेच्या विविध स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शन करणारे शिक्षक सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .