शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत आवश्यक कार्यवाही करून सुधारित सेवाजेष्ठता यादी तयार करण्याचे लेखी आदेश teacher sevajeshthata aadesh
विषय : महाराष्ट्र शासन राजपत्र शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि. २४/०३/२०२३ मधील तरतूदी आणि मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र.११२४३/२०२३ मधील दि.१८/०१/२०२४ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत आवश्यक कार्यवाही करून सुधारित सेवाजेष्ठता यादी तयार करण्याचे लेखी आदेश आपल्या विभागातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना निर्गमित करण्याबाबत.
संदर्भ :- १) महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-य, असाधारण क्र.९९ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश या व्यतिरिक्त) नियम व आदेश, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई दि.२४/०३/२०२४
२) या कार्यालयाचे पत्र क्र. शिनि/उवि/माध्य-आस्था/२०२२-२३/६५६१ दि.१०/०७/२०२३
३) मा. उच्च न्यायालय, मुंबई दाखल याचिका क्र. ११२४३/२०२३ मधील दि.१८/०१/२०२४ रोजीचे अंतरिम आदेश.
४) मा. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र क्र. शिसंमा- २०२४/अधिसूचना/ सेवाजेष्ठता/परिपत्रक/टी ४/१७६१ दि.२७/०३/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) १९८१ नियमावलीमध्ये दि. २४/०३/२०२३ रोजीच्या अधिसूचनानुसार नियम क्र.१२ आणि अनुसूची ‘फ’ मधील प्रवर्ग ‘क’ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.
दि. २४/०३/२०२३ रोजीच्या अधिसूचनानुसार शाळेतील शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी अद्ययावत करण्यात यावी. (सोबत दि. २४/०३/२०२३ रोजीची अधिसूचना व मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे दि.१८/०१/२०२४ चे आदेश जोडलेले आहे.)