जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या सन २०२३-२४ request teacher transfer
संदर्भ :- १) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. जिपंब/
४८२०/ प्र.क्र./२९०/ आस्था-१४ दिनांक ०७ एप्रिल २०२१.
२) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रं. संकिर्ण- २०२३ प्र.क्र.१७४/टिएनटी-/ दिनांक २१/०६/२३.
३) मा. शिक्षण उपसंचालक पुणे यांचेकडील दिनांक ११/०३/२०२४ चे पत्र.
४) उप सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रं. संकिर्ण /२०२३/प्र.क्र.१७४/टिएनटी-१/दि. ०६ मार्च २०२४.
५) मा. मुख्य कार्यकारी अधिकारीसो जि.प. सोलापूर यांचेकडील पत्रा क्रं. जिपसो/ शिक्षण/प्राथ/प्राशिनि/ ४५२/२०२४ सोलपूर दिनांक १४/०३/२०२४ चे पत्र.
उपरोक्त विषयान्वये या कार्यालयाकडील वरील संदर्भ क्रमांक ५ चे पत्राचे अवलोकन करावे. सदर पत्रान्वये आपले तालुक्यातील बदली इच्छुक प्राथमिक शिक्षक, पदविधर प्राथमिक शिक्षक / विषय शिक्षक, व मुख्याध्यापक (मराठी, उर्दू कन्नड) माध्यम यांचे विनंती बदलीकरीता अर्ज प्राप्त करुन घेवून तसेच सदरची माहिती मुळसेवापुस्तकातील नोंदीवरुन समक्ष पडताळणी करुन संदर्भ क्रं. ५ चे पत्रासोबत देण्यात आलेल्या विहीत प्रपत्रात (Excel Sheet) ENGLISH FONT मध्ये माहिती या कार्यालयास संबधित माहितीगार कर्मचारी व आपण समक्ष सादर करणेबाबत कळविण्यात आले नुसार काही तालुक्यांची माहिती प्राप्त आहे. परंतु सदर माहितीमध्ये त्रुटी आढळुन येत आहेत. तथापी काही कार्यालयानी आजअखेर माहिती सादर केलेली नाही हि बाब प्रशासकियदृष्टया खचितच योग्य नाही. सबब संदर्भ क्रमांक ५ चे पत्रासोबत जोडलेले विहीत नमुन्यातील माहिती सोबत जोडलेल्या प्राधान्यक्रमानुसार माध्यमनिहाय व संवर्गनिहाय स्वंतत्र यादया दिनांक २५/०४/२०२४ रोजी समक्ष स्वॉप्ट कॉपी व स्वाक्षरीत हार्ड कॉपीसह आपले कार्यालयातील माहितगार कर्मचारी यानी समक्ष सादर करावी. याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सोलापूर या वारंवार आढावा घेत आहेत.
सबब आपणास कळविण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक ५ चे पत्रान्वये नमुद केलेल्या प्रपत्रातील माहिती उपरोक्त नमूद प्रमाणे तात्काळ या कार्यालयास सादर करणेची दक्षता घ्यावी. तसेच यापुर्वी ज्या कर्मचारी यानी परस्पर या कार्यालयास विनंती बदलीसाठी अर्ज केले आहेत ते विचारात घेण्यात येणार नसल्याबाबत संबधिताना कळविणेत यावे. प्रकरणी विलंब झालेस आपणास जबाबदार धरणेत येईल याची नोंद घ्यावी.