सन २०२३ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत online teacher transfer

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२३ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत online teacher transfer

संदर्भः- १) महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र.जिपब- ४८२०/ प्र.क्र.२९०/आस्था१४, दि.७/४/२०२२.

उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्र. १ चे शासन निर्णयान्वये प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांबाबत सुधारित धोरण निश्चीत करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२३ मधील ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही पूर्ण झालेली असून या जिल्ह्यातून जाणाऱ्या मराठी/कन्नड/उर्दू शिक्षकांची संख्या १२७ इतकी आहे.

त्यानुसार, संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करणेकामी करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने आपणास सूचीत करणेत येते की, सन २०२३ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची यादी सोबत जोडली असून, त्यामधील आपले अधिनस्त शिक्षकांची खालील बाबींची पडताळणी करणेत यावी.

१) संबंधिता विरुध्द खाते निहाय चौकशी सुरू अथवा प्रस्तावित आहे/नाही.

२) संबंधितांकडून शासकीय/निमशासकीय/खाजगी पतसंस्था/बैंका याबाबत येणे-देणे आहे अगर कसे? असल्यास त्याबाबतची पूर्तता करणेबाबत संबंधितास सूचीत करावे.

३) संबंधितास कार्यमुक्त केल्यानंतर त्यांचे भविष्यात काही येणे देणे निघाल्यास ते एक रकमी भरण्यास तयार असलेबाबत १०० रुपये स्टॉम वर दंडाधिकारी यांचे समोर प्रतिज्ञा पत्र करणेबाबत संबंधितास सुचित करावे.

online teacher transfer
online teacher transfer

उपरोक्त कागदपत्रे आपलेकडे जमा करून घेवुन, त्या आधारे संबंधित शिक्षक कार्यमुक्तीसाठी पात्र/अपात्र/नकार इ. शेरे या पत्रासोबत जोडणेत आलेल्या यादीमध्ये नमूद करावेत व सदर स्वाक्षरीत यादी दि.२६/०४/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा या कार्यालयाकडे सादर करणेबाबतची दक्षता घ्यावी.

आपलेकडील अहवाल प्राप्त झालेनंतर त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही व माहिती अप्राप्त शिक्षकाचा बदलीस नकार समजणेत येईल याची नोंद घ्यावी.

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे यादी येथे पहा pdf download 

Leave a Comment