वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक यांच्या सेवा अधिग्रहीत करणेबाबत vetan truti nivaran samiti
शासन आदेश :-उपरोक्त वाचा येथील शासन निर्णय दिनांक १६.०३.२०२४ अन्वये सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावयाचा आहे. त्यामुळे वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी खालील कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहीत करुन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत :-
२. उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी ०६ महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करणेपर्यत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येत आहेत. उपरोक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनादी विषयक बाबी संबंधित कर्मचारी ज्या विभागात सध्या कार्यरत आहेत त्या विभागाकडून हाताळण्यात येतील.
३. उपरोक्त कर्मचाऱ्यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतिक्षा न करता दिनांक २४-०४-२०२४ (म.पू.) रोजी वित्त विभाग/सेवा-९ येथे रूजू अहवाल सादर करावा. सदरचे आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही. तसेच सदर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या कोणत्याही विनंतीची दखल घेतली जाणार नाही. त्याचप्रमाणे सदर
शासन आदेश क्रमांका संकीर्ण-२०२४/प्र.क्र.६५/प्रशा-३(१४-अ)
प्रयोजनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी रुजू होण्यास हयगय केल्यास त्यांच्या विरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्ताविण्यात येईल.
४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०४२३१६४०४५३५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.