शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील:मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही teacher recruitment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक नियुक्तीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील:मतदान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यवाही teacher recruitment 

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे.शिक्षण विभागाने शाळांमधील रिक्तपदांवर नियुक्तीसाठी गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची शिफारस केली होती. मात्र, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने एक

महिन्यापासून नियुक्ती प्रकिया रखडली होती. दरम्यान, शिक्षण

विभागास शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत केंद्रीय निवडणूक

आयोगाची शुक्रवारी परवानगी प्राप्त झाली. त्यानुसार ज्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेथे नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त

सूरज मांढरे यांनी दिली.

पवित्र पोर्टलमार्फत दिनांक २५ फेब्रुवारीला गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोग यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले होते.

teacher recruitment 
teacher recruitment

Leave a Comment