गुढीपाडवा सणाचे विशेष महत्त्व : गुढीपाडवा सण का साजरा केला जातो? Gudhipadva festival celebration
गुढीपाडवा हा सण म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस होय हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्त आहेत त्या मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या सणाचे सर्वात जास्त महत्त्व आहे हिंदू कालदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचे मुहूर्त असल्यामुळे या सणाला लोक सोन्याच्या विविध वस्तू खरेदी करतात.
यावर्षीचा गुढीपाडवा 9 एप्रिल 2024
या दिवशी साजरा करण्यात येणार आहे या सणाचे साजरा करण्यामागील वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत.
हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या विशेष महत्त्व
हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो कारण या दिवसापासून हिंदू नववर्ष साजरी केले जाते या दिवसापासून नवीन कालदर्शिका अमलात आणली जाते. हिंदू धर्मीयांमध्ये अतिशय महत्त्वाचे साडेतीन मुहूर्त आहेत त्या मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त होय.
गुढीपाडवा हा सण साजरा का केला जातो
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये पौराणिक कथा नुसार ब्रह्मदेवाने आपल्या या पृथ्वीची सजीव सृष्टीची निर्मिती केलेली आहे अशी गुड कल्पना आहे या करिता गुढीपाडव्याचा हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील मानला जातो ब्रह्मदेव हा या सृष्टीचा निर्माते आहेत असे मानले जाते.
प्रभू श्रीरामाचे विजय दिवस
गुढीपाडवा हा सण म्हणजे प्रभू श्रीरामाचा विजय दिन म्हणून देखील मानला जातो कारण प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवला ते आयोद्यमध्ये पुन्हा परत आले होते. त्यामुळे प्रभू श्रीरामांचे आयोध्या नगरीमध्ये स्वागत करण्यासाठी सर्व घरांवर भगवा ध्वजा पताका फडकवण्यात आल्या होत्या त्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
गुढीपाडव्याचे महत्त्व
गुढीपाडवा हा एक हिंदू धर्मीयांचा नववर्ष सण आहे या सणापासून हिंदूंच्या नववर्षाला सुरुवात होत असते ही सुरुवात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते मराठी नववर्षाची सुरुवात देखील गुढीपाडव्यापासूनच सुरुवात होते म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो.
गुढीपाडव्याला विशेष खरेदी केली जाते
गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या सणाच्या निमित्ताने अनेक नवीन वस्तूंची खरेदी केली जाते व त्या वस्तूची पूजा अर्चा केली जाते अनेक लोक सोन्याचे दाग दागिने खरेदी करतात तसेच कोणत्याही प्रकारचे नवीन काम माझी सुरुवात या सणापासूनच केली जाते तसेच नवीन घर बांधणे असो विहीर खाणे असो किंवा दुकान उद्घाटन असो अशा प्रकारचे नवनवीन कामे या दिवसाला महत्त्वाचे समजून सुरुवात केली जाते त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आलेले आहे
नवीन दुकानाचे व्यवसाय आरंभ उद्घाटन
या सणाच्या निमित्ताने अनेक लोक नवीन व्यवसायाचे सुरुवात करतात नवीन दुकाने टाकली जातात त्यांचे उद्घाटन देखील या सणाच्या निमित्ताने केली जाते.
नवनवीन वस्तू खरेदीसाठी दिवस शुभ
या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी नवनवीन वस्तूंची खरेदी केली जाते घरामध्ये नवीन गाडी टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल घेतल्या जातात तसेच दाग दागिने केले जातात सोन्याचे विशेष महत्त्व आहे सोने खरेदीसाठी बाजारपेठा भरल्या जातात
पर्यावरण दृष्टिकोनातून महत्व
गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो याला पर्यावरण दृष्टीने देखील महत्त्व आहे या दिवसाला लोक निसर्गाचे आभार मानतात व निसर्गाचे रक्षण करण्याचा संकल्प देखील करतात.
महाराष्ट्रात गुढीपाडवा सणाचे विशेष महत्व
या सणाच्या निमित्ताने घरोघरी घोड्या उभा केला जातात यामध्ये एरंडया वनस्पतीला खूप महत्त्व आहे एरंडाच्या झाडाला थोडी बांगडी तसेच साडी बांधली जाते व वरून तांब्या पालथा घातला जातो व त्याला गोड गाठीचा प्रसाद दिला जातो गुडीची पारंपारिक पद्धतीने पूजा केली जाते व गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो त्यानंतर घरातील लोक पुरणपोळीचा आस्वाद घेतात.