कंदील भेट देताच जिल्हाशिक्षणाधिकारी यांची जिल्हा परीषद शाळेला भेट

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कंदील भेट देताच जिल्हाशिक्षणाधिकारी यांची जिल्हा परीषद शाळेला भेट.

जिल्हा परिषद शाळातील विद्युत बिल थकल्याने विद्युत कनेक्शन कट करण्यात आले आहेत शाळांमध्ये विद्युत जोडणी द्यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी जिल्हा परिषद समोर आंदोलन करत शिक्षण अधिकाऱ्यांना कंदील भेट दिला यानंतर शिक्षणाधिकारी यांनी शाळेवर भेट देऊन पाहणी केली.

बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 772 शाळांना वीस पुरवठा नाही तर थकीत वीज बिलामुळे 620 शाळांमधील वीजपुरवठा खंडित केला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे संगणक ई लर्निंग स्मार्ट टीव्ही वीज उपकरणे बंद असल्याने डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असून महावितरणाने जिल्हा परिषद शाळांचे विज बिल माफ करावे व तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा जिल्हा परिषद इमारत बांधकामाचा 16 कोटी रुपये अ खर्चित निधी परत मिळवून दर्जेदार बांधकाम करण्यात यावे आणि बीड तालुक्यातील सानप वस्ती रुद्रापूर केंद्र पारगाव शिरस येथील जिल्हा परिषद शाळा झाडाखाली भरते आणि गेवराई तालुक्यातील गंगावाडी जिल्हा परिषद शाळेचे दुरुस्त आहे त्यासाठी तातडीने इमारत बांधकाम निधी उपलब्ध करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 21 ऑगस्ट 2023 वार सोमवार रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच अंधारात आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्फत मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

बीड मधील पारगाव सिरस केंद्रातील रुद्रापूर या गावची शाळा कंदील भेट आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी झाडाखाली भरणारी शाळा सानप वस्ती रुद्रापूर केंद्र पारगाव सिरस शाळेला भेट दिली

एकीकडे शासन डिजिटल शाळा च्या नावाने प्रत्येक शाळा  डिजिटल झाली पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेला डिजिटल साहित्य मिळाले पाहिजे प्रत्येक विद्यार्थी डिजिटल दुनियेमध्ये वावरला पाहिजे डिजिटल शाळा ही काय असते ही संकल्पना खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने सर्व महाराष्ट्रात राबवली आहे आणि त्या डिजिटल शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेला चांगल्या प्रकारचे संगणक उपलब्ध करून दिलेले आहे काही शाळांना ई लर्निंग रूम दिलेले आहेत काही शाळांना प्रोजेक्टर दिलेले आहेत काही शाळांना लॅपटॉप चा सुविधा दिलेल्या आहेत तर काही शाळांना टॅबची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा प्रकारे डिजिटल शाळा ही संकल्पना महाराष्ट्र राज्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने राबवलेले आहेत परंतु या डिजिटल शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे मुले देखील या आधुनिक युगामध्ये डिजिटल शाळेचा त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे शाळेतील डिजिटल साहित्यांचा वेळोवेळी वापर झाला पाहिजे आणि तो वापर व्हावा म्हणून शासन वेळोवेळी पाठपुरावा करत असते परंतु महाराष्ट्रातील अनेक गावे असे आहेत की ज्या ठिकाणी स्वतंत्र्यापासून अद्याप पर्यंत देखील विद्युत पोहोचलेली नाही अशा शाळांमध्ये देखील डिजिटल साहित्य पुरवलेले असताना आणि बऱ्याच शाळांमध्ये विद्युत सेवा असून सुद्धा त्या ठिकाणी विद्युत पुरवठा केला जात नाही विद्युत पुरवठा खंडित केला जातो शालेय विद्युत दिले भरली जात नाहीत खऱ्या अर्थाने ही विद्युत दिले महाराष्ट्र शासनानेच भरायला पाहिजेत असे आदेश असताना देखील त्या गावचे ग्रामसेवक या ग्रामपंचायत मार्फत विद्युत बिले भरण्यास नकार देतात त्यामुळे जाणीवपूर्वक शाळेचा विद्युत पुरवठा खंडित करून शाळेला अंधारात ठेवले जाते याचा परिणाम डिजिटल साहित्य व डिजिटल शाळेवर होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणे कठीण झाले आहे ही समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि ठोस पावले उचलणे गरजेचे आहे परंतु महाराष्ट्र राज्य शासन तसेच शिक्षण विभाग शालेय शिक्षण विभाग या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही व त्याचा परिणाम शाळेतील डिजिटल साहित्य बंद होण्यावर होतो आणि हे डिजिटल साहित्य बंद झाले तर ते पुन्हा महिना सुरू होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो विद्यार्थी आता आधुनिक माध्यमातून शिक्षण घेत आहेत त्यांना लॅपटॉप वरील धडे तसेच प्रोजेक्ट शिकण्यास मदत होत आहे ई लर्निंग रूमच्या माध्यमातून विद्यार्थी बाहेरच्या देशांमध्ये देखील संपर्क साधत आहेत अशा प्रकारचे साहित्य प्रत्येक शाळेला मिळाला पाहिजे परंतु अनेक शाळा या साहित्य विना चालू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटल शाळा ही संकल्पना राबवली जात आहे परंतु काही अशा शाळा आहेत की अजून तिथे साहित्य पुरवलेले नाही त्यामुळे डिजिटल साहित्य काय असते हे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना माहीत नाही बरं काही शाळांमध्ये साहित्य पुरवले आहे परंतु ते चालू नाही ते चालू नसण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा नाही आणि विद्युत पुरवठा नसल्यामुळे ते साहित्य उपयोगात आणले जात नाही काही शाळांमध्ये विद्युत पुरवठा आहे परंतु त्या ठिकाणी बिल न भरल्यामुळे थकीत बिलामुळे येथील कनेक्शन कट करण्यात आलेले आहे अशा शाळांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे खऱ्या अर्थाने शासनाने ठोस पावले उचलून सर्व शाळांची बिले ही स्वतः भरली पाहिजेत कारण शाळा ही बिले कुठून भरणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

इमारतीची आवश्यकता

काही शाळांना इमारतीची आवश्यकता आहे तेथे विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही अनेक शाळा या पत्र्याच्या शाळेमध्ये भरत आहेत काही शाळा त्यांना पक्क्या भिंती नाहीयेत काही शाळांना तर शेत पावसाळ्यामध्ये पूर्ण गळून जात आहे काही शाळांचा स्लॅब कोसळण्याच्या मार्गावर आहे तर काही शाळांना इमारतच नाही अशा शाळा झाडाखाली भरताना दिसत आहेत ही गोष्ट खूप गंभीर स्वरूपाची आहे भारत एक महासत्तेकडे जागतिक महासत्ता होत असताना एकीकडे शाळा नाही इमारती नाहीत आणि स्वप्न आपली जागतिक महासत्ता बनण्याची आहे आपण त्याच वेळेस महासत्ता होऊ शकतो ज्यावेळेस शिक्षण आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ या मूलभूत सुविधा जर मिळाल्या नाहीत तर भारत महासत्ता होऊ शकत नाही त्यामुळे शिक्षण ही एक काळाची गरज आहे आणि आधुनिक शिक्षण आज डिजिटल युग या माध्यमातून मिळत असताना काही शाळांना इमारत नाही ही खूप खेदाची गोष्ट आहे अशा शाळांची खऱ्या अर्थाने सर्वेक्षण करून त्या त्यांना ताबडतोब इमारत उपलब्ध करून द्यायला पाहिजे निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे व अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी इमारत जिल्हा प्रशासनाकडून मिळाली पाहिजे या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने शासनाने लक्ष घालायला पाहिजे.

डिजिटल साहित्य digitalschool

प्रत्येक शाळेला संगणक मिळालेले आहे प्रत्येक शाळेला प्रोजेक्टर मिळालेले आहे काही शाळांना ई लर्निंग साहित्य मिळालेले आहे या ई लर्निंग साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थी प्रदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आपल्या देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांशी विद्यार्थी संवाद साधतात त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तेथील बोलीभाषा समजते तेथील विविधता विद्यार्थ्यांच्या लक्षात येते त्यामुळे विद्यार्थ्यांचा विचार करण्याची क्षमता वाढते व विद्यार्थी मनोरंजनात्मक अध्ययन करतात काही विद्यार्थी इंग्रजी मधून प्रदेशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात त्यावेळेस तेथील विद्यार्थ्यांची भाषा विद्यार्थ्यांच्या लक्षात येते व विद्यार्थी आनंददायीरीत्या अध्ययन करतो. विद्यार्थ्यांच्या विचार समितीमध्ये देखील बदल होतो जसे आपण आहोत तसेच प्रदेशातील विद्यार्थी पण शाळा शिक्षण घेतात तेथे पण शिक्षक शिकवतात हा विचार त्यांच्यामध्ये येतो. विद्यार्थी प्रदेशातील शाळेतील साहित्य पाहतात प्रदेशातील अध्ययन अध्यापनाच्या पद्धती पाहतात या सर्व गोष्टी डिजिटल साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जातात.

भारत एक जागतिक महासत्ता

येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम शिक्षण या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे शिक्षणाने मानवी सुधारणा होते त्यामुळे विचार क्षमता वाढते कौशल्य विकसित होतात आणि भावी आधारस्तंभ हे खऱ्या अर्थाने शाळेमध्ये घडतात त्यामुळे शाळा ही भक्कम असणे गरजेचे आहे शाळा ही गावाचा कणा असला पाहिजे त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त शाळा असावी सुविधा म्हणजे विविध प्रकारच्या इमारती खोल्या असाव्यात क्रीडांगण असावे स्वच्छता त्या ठिकाणी असावे पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे ही इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी असावे त्या ठिकाणी मनुष्यबळ पूर्ण असावे तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शाळांच माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करू शकतो विद्यार्थ्यांना उच्च स्तरावर येऊ शकतो त्यामुळे भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

मनुष्यबळ

अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आपल्या देशामध्ये जाणवत आहे कारण अनेक शाळा या पहिली ते आठवीपर्यंत सरकारी शाळा आहेत आणि त्या ठिकाणी शिक्षक संख्या कमी पडते कुठे पहिली ते आठवीचे वर्ग आहेत व दोनच शिक्षक आहेत कुठे पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे परंतु एकच शिक्षक आहे कुठे पहिली ते पाचवी पर्यंत शाळा आहे एकच शिक्षक आहे विद्यार्थी संख्या भरपूर आहे परंतु शिक्षक संख्या कमी पडत आहे त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे व मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे व त्या मनुष्यबळाच्या माध्यमातून विद्यार्थी कसा घडला जाईल याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे.

विद्युत साहित्य

अनेक शाळांमध्ये विद्युत पुरवठा नाही त्या ठिकाणी सौर प्लेटच्या माध्यमातून त्या शाळेला विद्युत पुरवठा केला पाहिजे व तेथील डिजिटल साहित्य अद्यावत केले पाहिजे त्याचा वापर दररोज झाला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल साहित्याच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन करणे मनोरंजक रित्या पूर्ण होईल व विद्यार्थी शिक्षक व पालक यांची अध्ययन अध्यापनातील गोडी वाढेल त्यामुळे पालक देखील आपल्या मुलाला आनंदी वातावरणात पाठवण्यात पुढे येईल अशा प्रकारे डिजिटल साहित्य चालू ठेवणे हे सर्वांची जबाबदारी आह शाळेला विद्युत पुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांनी वेळेतच पूर्ण करायला हवी आहे.

Leave a Comment