(प्राथमिक स्तर) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याबाबत गुण व नोंदी मार्गदर्शक सुचना evaluation guide instructions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(प्राथमिक स्तर) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याबाबत गुण व नोंदी मार्गदर्शक सुचना evaluation guide instructions 

सन २०१० – ११ या शैक्षणिक वर्षापासून इ. १ ली ते ८ वी साठी (प्राथमिक स्तर) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्याबाबत.

* प्रस्तावना –

महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सुधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २००६-२००७ पासून सुरु असून नवीन अभ्यासक्रमाबरोबरच इयत्ता पहिली ते आठवीच्या (प्राथमिकस्तर) विद्यार्थ्यांसाठी दिनांक ३१ ऑगस्ट २००४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मूल्यमापनपद्धती विहित करण्यात आली होती.

१. केंद्र सरकारने २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ (ओ) मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. त्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम, [(Right of Children to Free and Compulsory Educa- tion. ACT 2009 (No. 35, 20009)] केंद्र सरकारने पारित करून तो भारत सरकारच्या २७/०८/२००९ च्या राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. तसेच भारत सरकारच्या दिनांक १६/०२/२०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक ०१/०४/२०१० पासून संपूर्ण भारतात (जम्मू व काश्मीर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.

२. समता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मूल्ये. सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून साधली जाऊ शकतात. यादृष्टीने हा अधिनियम अमलात आणला आहे. त्यामुळे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची, त्यांना शाळामध्ये प्रवेश देण्याची, उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे.

* शासन निर्णय

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. विकाक-२००९/प्र.क्र. २९२/प्राशि-१, दि. १० मे २०१० अन्वये बालकांना मोफत सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ दिनांक १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही बोर्डाची परीक्षा द्यावी लागणार नाही. सदर अधिनियमामधील कलम २९ (१) व (२) नुसार सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी पुढीलप्रमाणे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.

* सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचा हेतू

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूंचे सातत्याने आणि विविध अंगाने मूल्यमापन करण्यासाठी वापरावयाची शाळास्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय.

अ) आकारिक मूल्यमापन (Formative Evaluation)

आकारिक मूल्यमापन करताना खालील आठ तंत्रापैकी कोणत्याही किमान पाच तत्रांचा वापर करून सातत्यपूर्ण

व सर्वंकष मूल्यमापन केले जावे त्याचे निकष खालीलप्रमाणे

* नोंदीबाबत सूचना *

* प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयातील प्रगतीच्या नोंदी सत्रनिहाय कराव्यात.

* प्रत्येक सत्रासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी किमान दोन पृष्ठे वापरावीत.

विषयाच्या प्रगती संदर्भातील नोंदी करताना त्या विषयासाठी जी साधन-तंत्रे निवडली आहेत ती लक्षात घेऊन नोंदी कराव्यात.

जसे :- कला विषयासाठी प्रात्यक्षिक / प्रयोग, उपक्रम /कृती, दैनंदिन निरीक्षण, तोंडीकाम ही साधन- तंत्रे निवडली तर कला विषयातील प्रतिसादाच्या नोंदी साधन तंत्रनिहाय कराव्यात म्हणजे कला विषयाचे प्रात्यक्षिक करताना उल्लेखनीय काय आढळून आले, विद्यार्थ्यांच्या अडचणी कोणत्या ?

कला विषयाचे उपक्रमातील सहभागाचे स्वरूप, नावीन्य कसे आहे? दैनंदिन निरीक्षणातून कोणते गुण दिसून

येतात.

कृतीतील नावीण्य, स्वतःच्या कल्पकतेचा वापर, उपलब्ध साधनांचा वापर करून कृती पूर्ण करण्याची धडपड इत्यादी.

तोंडी कामातून – कल्पना कशी सुचली? कृती करताना कोणत्या अडचणी आल्या, त्यावर मार्ग कसा काढला ? कोणकोणत्या कृती कोणत्या क्रमाने केल्या? इत्यादी.

विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्रगती आणि अध्ययनातील त्रुटी, अडचणींच्या नोंदी कराव्यात.

विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्रगतीची दखल घेऊन जाहीर शाबासकी द्यावी.

नोंदीचे संकलन व वर्गवारीवरुन वर्गात एकत्रित मार्गदर्शन / गटात कार्य/वैयक्तिक मार्गदर्शन / स्वाध्याय, सराव अशा स्वरुपात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील त्रुटी, अडचणी दूर कराव्यात.

शासन निर्णय pdf download

Leave a Comment