संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत sanklit pat exam

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत sanklit pat exam

विषय : नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी २ आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेसंदर्भात सुधारित सूचना देणेबाबत sanklit pat exam

संदर्भ

इयत्ता पहिली ते आठवी सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका पीडीएफ इथे पहा 👉👉pdf download 

: १. शासन निर्णय क्रमांकः आरटीई-२०२२/प्र.क्र.२७६/एसडी.१ दि. ०७.१२.२०२३

२. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/PAT संमू२/२०२३-२४/११८२ दि. ०७.०३.२०२४

उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने संदर्भ क्र. २ अन्वये नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) (संकलित मूल्यमापन २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन – २)

२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.

३. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन २ घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन – २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे.

३. इयता ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.

४. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.

५. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

• इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः

२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय

स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात

घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.

४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

५. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.

sanklit exam 
sanklit exam

Leave a Comment