होळी सणाचे महत्व होळी सण पूर्ण भारतात साजरा केला जातो colours of holi
होळी सण कुठे कुठे साजरा केला जातो ४/०३/२०२४- होळी पौर्णिमा…!
फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.होळी सणाचे महत्व होळी सण पूर्ण भारतात साजरा केला जातो colours of holi या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपताच ऋतुंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होते. धरती माता नवनवीन पानफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा, उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गर्जत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशावेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण.
वाईट विचारांची दहन म्हणजे होळी होय
होळी ही प्रत्येक गावामध्ये घरोघरी साजरी केली जाते यामध्ये गौर्या लाकडं होळीमध्ये विसर्जित केले जातात खऱ्या अर्थाने होळी का साजरा करावा यामागे अनेक कारणे आहेत अनेक आख्यायिका आहेत परंतु यामागे खऱ्या प्रकारे जर पाहिलं तर होळी सण साजरा करतात कारण आपल्या मधील वाईट विचारांचे दहन करायला हवे या मागचा खरा अर्थ घ्यायला पाहिजे परंतु त्याच अर्थ न घेता लाकडा नवऱ्या पेटून होळी सन साजरा केला जातो
उत्तर भारतात यालाच दोलायात्रा, होरी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा shimga म्हणतात. याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले, तरी संस्कृती मात्र एकच आहे. होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरा केला जातो हे विशेष. यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते. हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात.
खरं म्हणजे होळी हा सण निसर्गाची संक्रमण अवस्था सुचविणारा आहे. संक्रमण म्हणजे बदल. विविध झाडांची पाने गळतात, वनश्रीची शोभा नाहिशी झालेली असते. सारे थंडीने बेजार झालेले असतात. अशा या स्थितीत बदल होणार असतो, प्राणीमात्रात जोम, उत्साह येणार असतो, ते सांगणारा हा सण; थंडीचे त्रासदायक दिवस संपल्याचा हा आनंदोत्सव.
पानझडीने स्रुष्टीमातेचे अंगण अस्वच्छ झालेले असते. सगळीकडे पालापाचोळा पडलेला असतो. आता ऋतुराज वसंताची स्वारी येणार; याला ही घाण, अस्वच्छता कशी आवडेल? म्हणून पौर्णिमेच्या शुभदिवशी ही अस्वच्छता नाहीशी करायला, तिची होळी करायला पूर्वजांनी सांगितले आहे. या स्वच्छतेच्या सोहळ्याला धार्मिक बनविले आहे. परिसर स्वच्छ असणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही आवश्यक आहे.
*होळीचा वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व :*
उन्हाळा सुरू झालेला असतो, जमीन भाजून निघते. तिच्यातून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच राहीली तर आरोग्यासाठी हानीकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याची आठवण करुन देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञता पूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन, स्वागत.
*पावरा समाजातील होळी :*
इतर आदिवासींप्रमाणे पावरा लोकात होलिका दिवस सगळ्यात मोठा सण असतो. होलिका देवीस पावरी भाषेत हुवी, हवावी, कली असेही म्हणतात. ही देवी आपल्यावर कृपाछत्र ठेवते, आपली मनोकामना पूर्ण करते, अशी पावरा लोकांची श्रध्दा आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या सुमारास साजरा करतात. या काळात शेतीचा हंगाम संपलेला असतो. जंगल फळापुलांनी बहरलेले असते. होलिका देवीच्या कृपेनें आपण सुखी समाधानी राहू अशी पावरा समाजाची श्रध्दा आहे.
*उत्तरेत हा सण कृष्णासाठी आहे असे मानतात :*
कृष्ण तान्हा असतांना त्याला मारण्यासाठी कंसाने पुतना नांवाच्या राक्षसीला पाठविले होते. कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि तिचे दूध पितापाता तिचे प्राणही प्राशन केलेल्या पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले, असे ते लोक मानतात. महाराष्ट्रात प्राचिन काळी हुंठा नांवाची राक्षसी लहान मुलांना त्रास देत असे. तिला हुसकावून लावण्यासाठी फाल्गुनी पौर्णिमेला मोठा जाळ केला होता. त्यामुळे ती पळून गेली.
*दक्षिण भारतात हा उत्सव कामदेवासाठी मानतात :*
भगवान शंकर आपल्या तपश्चर्येत मग्न होते. देवांनी शंकराचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवाला सांगितले. ते शंकराला समजताच ते रागावले त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला. आणि कामदेवाला किंवा मदनाला जाळून टाकले. त्याची आठवण म्हणून दक्षिणेत कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळण्याची प्रथा आहे. उद्देश एवढाच की, अनेक ठिकाणी उन्हाळ्याचे दिवसात ठिकठिकाणी आग वगैरे लागते तेव्हा अग्नीला शांत करण्याकरिता ही पौर्णिमा साजरी केली जाते.
*हा सण कसा साजरा करतात :*
या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्यभागी शेणाच्या गोवऱ्या, त्यात एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्याभोवती लाकडे, गोवऱ्या रचतात. त्याची पूजा करावी. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. खेडेगावात सगळे गाव मिळून गोवऱ्या, लाकडे गोळा करून सार्वजनिक ठिकाणी होळी करतात. तिची पूजा करतात, नंतर त्यात नारळ अर्पण करून खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात.
सर्वांनी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी. नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुख शांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो. असा संकल्प करावा. त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी. त्याची पंचोपचारे पूजा करून नैवेद्य द्यावा. तसेच घरात उपद्रव देणाऱ्या किटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात. म्हणजे जीवाणू नष्ट होतात, असा समज आहे. होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्या. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य, दोष, प्रव्रत्ती यांची होळी करावी. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात, हाच या सणाचा संदेश.
वटसावित्री, नागपंचमी, हरतालिका, हे जसे स्त्रियांचे सण आहेत त्याचप्रमाणे होळी हा पुरूषांचा सण आहे. जुने जाऊद्या मरणालागुनी । जाळुनी किंवा पुरून टाका ।। असे केशवसुतांनी म्हटले आहे. पाचदिवस हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करतात, तर पाचव्या दिवशी रंगपंचमीला सर्वांशी वैमनस्य सोडून देऊन प्रसन्न रंग उधळायचे असतात.