आकारिक मूल्यमापन द्वितीय सत्र इयत्ता पाचवी akarik evaluation
वर्ग 5 वा विषयः- शारीरिक शिक्षण
तोंडी काम 20 गुण
प्र 1 ला खालील क्रीडा प्रकारांची प्रत्येकी 2 उदाहरणे सांगा.(10 गुण)
1) खेळ
2) जाळीचे खेळ
3) बॅट/रॅकेट चे खेळ
4) शिवाशिवी चे खेळ
5) नेमबाजीचे खेळ
प्र 2 रा स्वतःची दिनचर्या कशी आहे ते सांगून त्या दिनचर्येतील वैशिष्ट्यपूर्ण बाबी सांगा.(5 गुण)
प्र 3 रा ऑलिंपिक विजेत्या पाच खेळाडूंची नावे सांगा(5 गुण)
उपक्रम 20 गुण
तुमच्या आवडीच्या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूची संपूर्ण माहिती संकलित करून त्याची छोटीशी माहिती पुस्तिका तयार करा.
प्रात्यक्षिक 60 गुण
प्र.1 ला सूर्यनमस्कार व्यायाम प्रकार करून दाखवा.(10 गुण)
प्र 2 रा खालील प्रकारातील योगासने करून दाखवा(.40 गुण)
1) उभ्या स्थितीतील आसने
2) बैठ्या स्थितीतील आसने
3) पोटावर झोपून आसने
4) पाठीवर झोपून आसने
प्र 3 रा बास्केटबॉल / व्हॉलीबॉल / टेनिस किंवा बॅडमिंटन / थ्रो बॉल या पैकी कोणत्याही एका खेळापासून तयार होणारा परिवर्तित खेळ खेळून दाखवा. (10 गुण)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विषय कार्यानुभव
तोंडी काम (20 गुण)
प्र 1 ला तुमच्या परिसरामध्ये चालणाऱ्या किमान दहा उद्योगांची नावे सांगा.(10 गुण)
प्र 2 रा पाणी वाहून आणण्याच्या विविध पद्धती सांगा.(10गुण)
उपक्रम 40 गुण
1) भूकंप /पूर/कोविड-19 यांच्या संदर्भातील घोषवाक्य संकलित करा.(20 गुण)
2) सुतळी दोरा मनी यापासून झुंबर व गोंडे तयार करा (अभिरुची पूरक उपक्रम(20 गुण)
प्रात्यक्षिक 40 गुण
1) वाळलेले गवत पाने फुले कागदावर चिटकून पक्षांच्या घरट्यांचा नमुना तयार करा. (कौशल्याधिष्ठित उपक्रम) (10 गुण)
2) ऐच्छिक उपक्रमः- फळ प्रक्रिया (10 गुण)
खालीलपैकी कोणताही एक पदार्थ तयार करा.
अ) कैरीचे लोणचे
ब) लिंबाचे सरबत
क) चिंचेचे पन्हे
3) रुमालावर स्वस्तिकच्या आकार काढून त्यावर सुई दोऱ्याच्या मदतीने बटन लावून डिझाईन तयार करा. ( प्राथमिक शिवणकाम) (10 गुण)
4) परिसरातील झाडांच्या बिया गोळा करून सीड बॉल तयार करा.
(10 गुण)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विषय कला वर्ग पाचवा
गायन (तोंडी काम) 20 गुण
भूप रागावर आधारित खालीलपैकी कोणतेही एक गीत youtube वरून ऐका. सराव करा आणि वर्गात गाऊन दाखवा.
1 अभिर गुलाल उधळीत रंग
2 ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
3) जय जय महाराष्ट्र माझा
4) देहाची तिजोरी
5) उठी श्रीरामा पहाट झाली
उपक्रम 40 गुण
शिल्प (10 गुण)
चहाचे कागदी ग्लास घेऊन त्यापासून कल्पकतेने शिल्प तयार करा.
किंवा
वर्तमान पत्राच्या नळ्या तयार करून तुमच्या कल्पनेने शिल्प तयार करा जसे फोटो फ्रेम टोपली चटई अक्षरे इत्यादी.
चित्र (10 गुण)
वर्तुळात विविध आकारांचा वापर करून नक्षीकाम करा व रंगवा.
कोलाज (10 गुण)
वेगवेगळ्या रंगाचे क्राफ्ट पेपर वापरून मांजरीचे कोलाज चित्र तयार करा.
प्रात्यक्षिक (40 गुण)
1 विविध सुषिर वाद्यांची चित्रे गोळा करा व चिकटवा 10 गुण
2 असयुक्त हस्त मुद्रा आणि संयुक्त हस्तमुद्राचे प्रात्यक्षिक करून दाखवा. (10 गुण)
3 तुम्हाला आवडणाऱ्या पौराणिक / ऐतिहासिक / किंवा जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची वेशभूषा करा. आणि त्याचा एखाद्या प्रसिद्ध संवाद म्हणून दाखवा (20 गुण)