सन २०२३-२४ मधील राज्यातील दुष्काळसदृश्य भागातील विद्यार्थ्यांची (इ.१०वी व इ.१२वी) परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करणेसाठी Online द्वारे माहिती सादर exam fees
संदर्भ-
करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत. १. शासन निर्णय क्र. एससीवाय-२०२३/प्र.क्र. ३७/म-७, दि.३१/१०/२०२३
२. शासन निर्णय क्र. एससीवाय-२०२३/प्र.क्र. ३७/म-७, दि.१०/११/२०२३
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.४७/एसडी-५, दि. १ ऑगस्ट, २०१९ शा. शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण २०१९/प्र.क.र.४७/एसडी-५, दि.०३/०२/२०२०
४. ५. शा.नि.क्र. एफईडी १५९२/१००२/ (११३२)/ साशि-५, दि. १८/१०/१९९३
. क्र.रा.मं. दं.वि.परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती/२३-२४/११३१, पुणे ४ दि.१३/३/२०२४
६ ७. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, महाराष्ट्र यांचे पत्र.
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शासनाचे संदर्भीय क्र.१व २ च्या शासन निर्णयानुसार, टंचाईग्रस्त / दुष्काळग्रस्त भागातील इ.१०वी व इ.१२वी च्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ही दुष्काळसदृश्य ४० राज्यमंडळ स्तरावरुन करण्यात येणार आहे. शासन तालुके निर्णयानुसार जाहीर झालेल्या व याव्यतिरिक्त १०२१ महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२४ मधील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी अनुक्रमे ‘http://feerefund.mh- ssc.ac.in’ आणि ‘http://feerefund.mh-hsc.ac.in’ ह्या लिंकवर उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर लिंकवर दि.२० मार्च, २०२४ पर्यंत माहिती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.
विविध शिक्षक संघटनांनी केलेल्या मागनीनुसार विद्याथ्याँची माहिती प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने, सदर माहिती सादर करण्यासाठी दि. २६ मार्च, २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. मुदतवाढीच्या अनुषंगाने आपल्या विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना दि. २६ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने माहिती भरणेबाबत अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सूचित करण्यात यावे. तसेच आपण वैयक्तिक लक्ष घालून विहित कालावधीमध्ये माहिती राज्यमंडळाकडे सादर करणेबाबत संबंधितांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे.