जिल्हातंर्गत बदलीसाठी कार्यरत इच्छुक शिक्षकांना विकल्पानुसार संधी देणे बाबत teacher request transfer
संदर्भ :- 1) ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक जिपब-4820/प्र.क्र.290/आस्था-14 दि. 07/04/2021
2) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.क्र.174/टीएनटी-1 दि.21/06/23
3) मा.उप सचिव, ग्राम विकास विभाग यांचे पत्र क्रमांक संकीर्ण-2024/प्र.क्र. 45/आस्था-14 दि. 11/03/2024
4) सर्व शिक्षक संघटना, जिल्हा जालना यांचे निवेदन दिनांक 14/03/2024 व दिनांक 15/03/2024
उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक (03) अन्वये संदर्भ क्रमांक (02) च्या शासन निर्णयानुसार आवश्यक कार्यवाही करावी. अशा सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक (02) च्या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक (02) मध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी. समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळास्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी. अशी तरतूद आहे.
त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक (02) च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वीपासून कार्यरत असलेल्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागा असल्यास समुपदेशाद्वारे पदस्थापना घेणेची संधी देणेस्तव बदली इच्छुक असलेल्या शिक्षकांना आपल्याकडे दिनांक 28/03/2024 पर्यंत अर्ज सादर करणे बाबत आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे. अर्ज प्राप्त शिक्षकांची माहिती या पत्रासोबतच्या विहित नमुण्यात माहिती संकलीत करुन सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी संबंधिताच्या अर्जासह या कार्यालयास दिनांक 28/03/2024 रोजी सादर करावी. सदर प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.