राज्य संवर्गातील या कर्मचाऱ्यांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अदा करणेबाबत dearness allowance

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य संवर्गातील या कर्मचाऱ्यांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अदा करणेबाबत dearness allowance

केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या क्रमांक ४२/०४/२०२४-P& PW (D) दिनाक १३.०३.२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

२. केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक १.०१.२०२४ पासून लागू करण्यात आलेली ४% महागाई भत्यातील (Dearness Relief) दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहतील. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

३. सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०३१९१६५७३३७४०७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

dearness allowance 
dearness allowance

Leave a Comment