सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व माझे गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विषयी दोन शब्द व्यक्त करणार आहे तेच तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती.
आज 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होय आजच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये नाहीतर जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते आपल्या देशामध्ये सर्व कार्यालयांमध्ये तसेच सर्व सरकारी शाळा खाजगी शाळा अनेक घरोघरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये जयंती साजरी केली जाते महिला घरासमोर रांगोळी काढतात गोडधोड जेवण बनवतात तसेच त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होते अनेक ठिकाणी व्याख्याने आयोजनाचे केले जातात भाषणात होतात शाळेमध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात स्पर्धा परीक्षा चे आयोजन केले जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण होईल व तेही देखील भविष्यामध्ये मोठ्या अधिकारी पदावर जातील यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते अतिशय उत्साहामध्ये एक सण म्हणून जयंती साजरी केली जाते.
त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये देखील डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव सोहळा आपण साजरा करत आहोत यानिमित्त सर्वजण जमलेले माझे सर्व सहकारी बांधव मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी थोडक्यात माहिती देणार आहे.
भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर speech on bhimjayantiयांना आपण बाबासाहेब आंबेडकर म्हणून देखील ओळखतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ असे होते
तर त्यांच्या आईचे नाव भिमाबाई मुरबाडकर सपकाळ असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे 14 वे अपत्य होते
रामजी मालोजी सपकाळ हे भारतीय सैन्यात सुभेदार या पदावर कार्यरत होते तर भिमाबाई मुरबाडकर सपकाळ या गृहिणी होत्या .
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे एक समाज सधारक होते ज्ञान शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी व समाजकारणी होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आणि भारतीय संविधानाचा मसुदा लिहिण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.
14 एप्रिल 1891 रोजी महू मध्य प्रदेश येथे जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच भेदभाव आणि असमानतेचा सामना करावा लागला त्यांनी आपले शिक्षण घेतले आणि भारत आणि प्रदेशातील विद्यापीठांमध्ये अनेक पदव्या मिळवल्या या पदव्यांमध्ये डॉक्टर एट पीएचडी लॉ अशा विविध मोठ्या पदव्या त्यांनी मिळवल्या.
अस्पृश्य आणि इतर उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी न्यायासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आणि विविध सामाजिक आणि राजकीय सुधारणांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी खूप मोठे असे योगदान दिले.
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यानी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख सदस्य होते नंतर त्यांनी अनुसूचित जाती फेडरेशन हा स्वतःचा राजकीय पक्ष काढला भारतीय संविधानात अस्पृश्य आणि इतर बहिष्कृत गटांच्या संरक्षण आणि उन्नतीसाठी तरतुदीचा समावेश करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
सामाजिक न्याय आणि समतेचा पुरस्कर्ते म्हणून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी वारसा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सह अमेरिकेतील उच्च कोलंबिया विद्यापीठातील द सिम्बॉल ऑफ नॉलेज हा जागतिक पुरस्कार विश्वभूषण द ग्रेटेस्ट इंडियन असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि राष्ट्राच्या संविधानाला आकार देण्यामधील त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी विधान साठी तसेच कामगारांसाठी व अस्पृश्यतांसाठी ती नष्ट करण्यासाठी आपले जीवन वाहिले खूप मोठा संघर्ष उभा केला व जगाला दाखवून दिले.
समाजातील अनेक रूढी परंपरा चालीरीती नष्ट करून एक सुज्ञ समाज घडवला व जगासमोर आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करून ठेवला अशा या महान व्यक्तीने 1956 मध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्धांचे विचार स्वतःमध्ये आचारण्यासाठी त्यांनी गौतम बुद्ध यांचा बौद्ध धर्म स्वीकारला.
म्हणूनच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे विचाराने आपल्या सोबत असल्यासारखे आपल्याला वाटते त्यांचे विचार अजरामर आहेत जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत त्यांचे विचार कधीही नष्ट होणार नाहीत पिढ्यानपिढ्या हे विचार चालूच राहतील आणि समाज घडवण्यासाठी मदत होईल आलेल्या अनेक पिढ्यांना येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या विचारांनी त्यांच्या आचारांनी समाज घडवला जाईल म्हणूनच त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने दरवर्षीप्रमाणे साजरी करत असतो त्यांचे विचार फक्त जयंती पुरते मर्यादित न राहता माणसाने आयुष्यभर आपल्या आचरणात आणले तर नक्कीच त्यामध्ये सुज्ञ समाज घडायला मदत होईल व सर्वांनाच समान हक्क समानता येईल
अशा या महान व्यक्तिमत्त्वाला माझे विनम्र अभिवादन