आदर्श आचारसंहिता आदेश आचारसंहिता मध्ये काय करावे व काय करु नये pdf acharsanhita loksabha election
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार व मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मादाम कामा रोड, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ ऑक्टोबर २०१६
क्रमांक रानिआ/नप-२०१६/प्र. क्र. ३१/का-६. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात व्हाव्यात यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या वर्तणुकीकरिता सर्वप्रथम १९६० साली केरळ विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली. याचा प्रभावी परिणाम लक्षात घेता ह्यात आवश्यकतेप्रमाणे सुधारणा करण्यात आली असून, आता ही आदर्श आचासंहिता सर्व निवडणुकांसाठी वापरली जाते.
२. आचारसंहिता ही लोकसभा व विधानसभेने पारित केलेला अधिनियम नसून, निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवार यांची आदर्श वर्तणूक कशी असावी, याबाबत राजकीय पक्षांनी स्वतःहून निश्चित केलेली मार्गदर्शक तत्वे आहे. (MCC is a set of norms for ideal conduct and behavior during elections, set of behavioral guidance for political parties and candidates. It is not a statute.) आदर्श आचारसंहिता जरी राजकीय पक्षांनी स्वतःहून निश्चित केलेला मापदंड असला तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी निवडणूक आयोगाकडून करण्यात येते आणि हे करताना संविधानाच्या अनुच्छेद ३२४ मध्ये उपलब्ध अधिकारांचा वापर करण्यात येतो.
आचारसंहिता👉👉 pdf download
३. भारतीय संविधानामध्ये १९९२ साली झालेल्या दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यात अनुच्छेद २४३-के व २४३-झेड- ए नुसार राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली असून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधीक्षण, संचालन व नियंत्रण यांची जबाबदारी त्यांचेवर (राज्य निवडणूक आयोग) सोपविण्यात आलेली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपिल क्र. ५७५६/ २००५, (श्री. किशनसिंग तोमर विरुद्ध अहमदाबाद महानगरपालिका व इतर) या याचिकेमध्ये दिनांक १९ ऑक्टोबर २००६ रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग यांचे अधिकार, शक्ती व दर्जा भारत निवडणूक आयोगाच्या समकक्ष आहेत.
४. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक होणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभेसाठी वापरण्यात येणारी आदर्श आचारसंहिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीसुद्धा स्वीकारलेली आहे. याकरिता राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले सर्व आदेश एकत्रित करून आदेश क्रमांक स्थास्वसं २०११/प्र.क्र.२५/का-०५, दिनांक २९ डिसेंबर २०११ रोजी काढले होते.
1 thought on “आदर्श आचारसंहिता आदेश आचारसंहिता मध्ये काय करावे व काय करु नये pdf acharsanhita loksabha election ”