आचारसंहितेआधी सगेसोयरे अधिसूचना लागू होणार:राज्य सरकार देणार अंतिम मंजुरी maratha reservation
मराठ्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शब्द खरा करणार
मुंबई :राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत स्वतंत्रपणे १० टक्क आरक्षण दिले असले तरी सगेसोयरे अधिसूचना अद्याप अंतिम झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू नये म्हणून राज्य सरकार यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सगेसोयरे अधिसूचनेच्या मसुद्यावर शिक्कामोर्तब करून ही अधिसूचना अंतिम करणार असल्याचे समजते.
या अधिसूचनेत स्वजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल. तसेच भाव-भावकी तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयऱ्यांना कुणवी पान २ वर
अधिसूचनेच्या मसुद्यातील तरतुदी
• सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न, नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेल्या नातेवाईकांना कुणबी दाखले मिळू शकतील.
• यामध्ये स्वजातीय विवाहातून जे नातेसंबंध
तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या
रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-
भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक
पद्धतीतील सगेसोयरे हे दाखले मिळण्यास पात्र
ठरतील.