मंत्रिमंडळ निर्णय ३२ शासन निर्णय मंजूर chief minister decision
दिनांक 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये राज्यातील विकासासाठी 32 शासन निर्णय मंजूर करण्यात आलेले आहेत ते शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार आहेत या बैठकीला सर्व मंत्री तसेच माननीय मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री हजर होते यांच्या उपस्थितीमध्ये सदर शासन निर्णय मंजूर करण्यात आलेले आहेत ते शासन निर्णय खालील प्रमाणे आहेत.
1.महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क
2.६१ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता
3.आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना
4.खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वसित प्रगती योजना
5.यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू
6.धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड
7.जीएसटीमध्ये नवीन ५२२ पदांना मान्यता
8.बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांना
दिलासा : मुद्रांक शुल्क कमी करणार
9.पुणे मेट्रोच्या ३ हजार ७५६ कोटींच्या कामांना मंजूरी
10.एमएमआरडीएच्या २४ हजार कोटींच्या कर्जास हमी
11.शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक
12.छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष
13.एमएमआरडीएला केएफडब्लुकडून कर्ज घेण्यास मान्यता
14.पिंपरी चिंचवडमधील शेतकऱ्यांना ६.२५ टक्के दराने जमीन परतावा अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड
15.नझूल जमिनीसाठी विशेष अभय योजना
16.एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना ३ आगाऊ वेतनवाढीचा लाभ
17.साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक घाटकोपरला
18.विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतींची राज्यस्तरीय योजना
19.औद्योगिक विभागांमधील नागरी जमीन कमाल धारणा अन्वये सूट देण्यात आलेल्या जमिनींसाठी अभय योजना
20.सावळी-सदोबा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
21.राज्य उत्पादन शुल्क विभागात सह आयुक्त पद
22.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सातारा जिल्ह्यातील वाटोळे येथे प्रशिक्षण केंद्र
23.सारथी संस्थेसाठी अमरावतीतील जमिनीच्या आरक्षणात बदल
24.गुढीपाडवा, आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा
25.जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही
26.राज्याच्या तृतीयपंथी धोरण २०२४ ला मान्यता
27.वनहक्क धारकांना सर्व योजनांचा लाभ देणार
28.गिरणी कामगारांसाठी घरकुले
29.डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये दोन शासकीय महाविद्यालये
30.७५ अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
31.जलसिंचन ग्राहकांना वीज दर सलवत योजनेस मुदतवाढ