छत्रपती संभाजीनगर, ता.९ : आधी दूरवर फेकल्या गेलेल्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे. कार्यरत असलेल्या आणि बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागेवर समुपदेशाने बदलीची संधी देण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. नवीन भरतीपूर्वी ही प्रक्रिया शिक्षण विभागाला राबवावी लागेल.
शासननिर्णय २१ जून २०२३ नुसार अशी संधी दिली जाणार आहे. सध्या नवीन शिक्षक भरती सुरू आहे. जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समुपदेशाद्वारे बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आलेली आहे. मात्र, शासन आदेशानुसार
कार्यवाही होत नसल्याबाबतच्या अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्हा परिषदे अंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्रामविकास विभागाच्या सहमतीने २१ जूनच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार बदलीबाबत आवश्यक ती कारवाई
करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे, असे उपसचिव तुषार महाजन यांनी उपसचिव ग्रामविकास विभाग यांना कळविले आहे.
शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत 66 शिक्षकांना इच्छुक ठिकाणी बदलीची संधी देण्यात आलेली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना इच्छुक ठिकाणी बदलीची संधी दिल्यास ते ज्ञानार्जनाचे काम मन लावून करतील. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती GG विभागाने आता या पत्रावर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देणे गरजेचे आहे. कारण शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत ग्रामविकास विभागाच्या आदेशाला अंतिम मान्यता आहे. – राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.