नवनियुक्त शिक्षकांना जागेवरच नियुक्ती आदेश मिळाला, गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले pavitra portal teacher bharti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवनियुक्त शिक्षकांना जागेवरच नियुक्ती आदेश मिळाला, गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले pavitra portal teacher bharti 

लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव : पवित्र प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्याला सुमारे १०५ शिक्षक मिळाले होते. मात्र, यापैकी चौघे कागदपत्र पडताळणीस व एक जण शनिवारी झालेल्या समुपदेशन प्रक्रियेस गैरहजर राहिले. उर्वरित शिक्षकांना जागेवरच नियुक्ती आदेश देण्यात आले. हे आदेश हाती पडताच गुरुजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह नको म्हणून सीईओ डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले.

जिल्ह्यात गुरुजींच्या रिक्त जागेंचं भिजत घोंगडं मागील काही वर्षांपासून कायम होतं. कारण बिंदू नामावली अपडेट नव्हती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी हा प्रश्न मिशन मोडवर घेत हा प्रश्न निकाली काढला होता. यानंतरच पवित्र पोर्टलमध्ये शिक्षण विभागाला शिक्षकांची मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने रिक्त जागांच्या ७० टक्के म्हणजेच १७४ रिक्त जागा कळविल्या होत्या. त्यानुसार भरती प्रक्रिया झाली असता, केवळ १०५ शिक्षक मिळाले. उर्वरित ६९ जागा रिक्तच राहिल्या आहेत. दरम्यान, शासन निर्देशानुसार उपलब्ध १०५

शिक्षकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ४ मार्च रोजी बोलावण्यात आले होते. यासाठी दोन पथके स्थापण्यात आली होती. या पथकांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता उपस्थित १०१ शिक्षकांच्या कागदपत्रांमध्ये कुठल्याही स्वरूपाची त्रुटी आढळून आली नाही. दरम्यान, या १०१ शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यासाठी शनिवारी समुपदेशन प्रक्रिया ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात १०० जणच हजर राहिले. सुरुवातीला शाळा निवडण्याची संधी दिव्यांग गुरुजींना देण्यात आली.

यानंतर महिलांना प्राधान्य दिले. यानंतर उर्वरित शिक्षकांची प्रक्रिया झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष तळ ठोकून होते. प्रक्रियेनंतर कोणत्याही स्वरूपाचा बदल होणार नाही, यासाठी स्पॉटवरच नियुक्ती आदेश दिले. एवढेच नाही तर जॉइनिंग लेटरही देण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे. १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असलेल्या तालुक्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यांत सर्वाधिक शिक्षक दिले आहेत. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी मोहरे, फाटक, विस्तार अधिकारी वाघमारे, उध्दव सांगळे, सहदेव हब्बू आदींची उपस्थिती होती. दरम्यान, नियुक्ती आदेश मिळालेल्या सर्व शिक्षकांना सोमवारी शाळेवर रूजू होण्याबाबत निर्देशित केले आहे.

Pavitra portal teacher bharti
Pavitra portal teacher bharti

 

Leave a Comment