तिरुवनंतपुरम: साक्षरतेत आघाडीवर असलेल्या केरळमध्ये शिक्षण क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग केले जातात. अशातच तिरुवनंतपुरम येथील एका शाळेने चक्क एआय शिक्षिकेची निर्मिती केली आहे. ‘इरीस’ असे या देशातील पहिल्या एआय शिक्षिकेचे नाव आहे. तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्यानव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
Artificial intelligences news तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्सलॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्यान रोबोटिक्स व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘इरीस’ची निर्मिती केली. इंटेल प्रोसेसर आणि डेडिकेटेड कॉम्प्रेसरमुळे शिक्षणाचा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. नीती आयोगाच्या २०२१ मध्ये सुरू केलेल्या ‘अटल टिंगरिंग लॅब’ (एटीएल) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला. नुकतेच ‘इरीस’चे सादरीकरण करण्यात आले.
काय आहेत वैशिष्ट्ये?
■ तीन वेगवेगळ्या भाषेत शिकविते; तसेच किचकट प्रश्नांचेही सहजतेने उत्तर दिले जाते.
व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने संवादात्मक शिक्षणावर भर; नवतंत्रज्ञान आणि एआयबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांशी संवाद
व्हॉइस असिस्टंट आणि जनरेटिव्ह एआयच्याArtificial intelligences news मदतीने ‘इरीस’ विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देते. तसेच त्यांच्या शंकाचे निरसनही करते. विशेष म्हणजे ती वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवादही साधते.
पत्रकाराचा रोबोटने केला विनयभंग
सौदी अरेबियाच्या एआय रोबोटने उद्घाटनाच्या दिवशीच एका महिला पत्रकाराचा विनयभंग केला, त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला, सौदी अरेबियाने पहिल्या रोबोटची निर्मिती केली, रोबोटबाबत माहिती देताना रोबोटने तिला नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने प्रसंगावधान राखत सावरले.