वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अपडेट:वेतन देयकासाठी वापरावयाचा नमुना medical bill allotment
(वेतन देयकासाठी वापरावयाचा नमुना) उपयोगिता प्रमाणपत्र आवश्यक नाही.
*वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अपडेट… MTR 44-A Allotment Problem Resolved… महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या पत्राची तात्काळ दखल…*
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके कोषागारात सादर करण्यासाठी ऑनलाइन MTR 44-A काढताना त्याण Allotment Year 2024-25 येत असल्याने राज्यभरात वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके मंजुरी संबंधाने अडचण निर्माण झाली होती. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेने मा. शरदजी गोसावी साहेब शिक्षण संचालक (प्राथमिक), मा. देविदासजी कुलाळ साहेब शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) आणि मा. पवनजी जोशी साहेब (MAHA IT Shalarth Team) यांना आज ६ मार्क रोजी सकाळी E-Mail व WhatsApp वर पत्र पाठवून सदर अडचण दूर करण्याची विनंती केली होती.
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित अडचण दूर केल्याचे दुपारी १२.५२ वाजता मा. पवनजी जोशी साहेबांनी कळविले आहे.
याबाबत खात्री केली असता नवीन काढलेल्या MTR 44-A Copy मध्ये दुरुस्ती झाल्याचे दिसून येत आहे.
अ) प्रमाणित करण्यात येते की, सदर मागणी तयार करताना मु.वि. नि. 1959, म.को. नि. 1968 व त्या अंतर्गत आज अखेरपर्यंत झालेल्या सुधारणा तसेच याविषयी आज अखेरपर्यंत निर्गमित करण्यात आलेले सर्व शासन निर्णय / शासन परिपत्रकामधील लागू असलेल्या सर्व तरतूदींची खात्री करण्यात आलेली असून उपरोक्त सर्व नियमांमधील विहित अटी व शर्तीचे व वित्तीय औचित्याच्या सुत्राचे पालन करुन हे देयक प्रदानार्थ कोषागारास सादर करण्यात येत आहे.
ब) प्रमाणित करण्यात येते की, सदरची मागणी तयार करताना आदात्यांच्या बैंक खाते क्रमांकाचा तपशील योग्य असल्याची खात्री करण्यात आलेली असून त्याप्रमाणे प्रदान करण्यास संमती देण्यात येत आहे.
क) प्रमाणित करण्यात येते की, सदरचे देयक यापूर्वी उपकोषागारे/कोषागारे/अधिदान व लेखा कार्यालयाने पारित करुन प्रदान केले नसल्याबाबत या कार्यालयाच्या देयक नोदवहीवरुन तथा पारगमन नोंदवहीवरुन खात्री करण्यात आलेली आहे.
ड) प्रमाणित करण्यात येते की, देयकान्वये मंजुर करण्याचे अनुदान हे लोकहितार्थ तथा शासकीय कामकाजास्तव आवश्यक आहे. खर्चास सक्षम प्राधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली असून खर्च मंजुरी अधिकारी अशी मंजुरी देण्यास सक्षम आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन तातडीने अडचण दूर केल्याबद्दल *मा. शरद गोसावी साहेब* (शिक्षण संचालक, प्राथमिक), *मा. देविदासजी कुलाळ साहेब* (शिक्षण उपसंचालक, प्राथमिक), *मा. पवनजी जोशी साहेब* (MAHA- IT Shalarth Team) यांचे हार्दिक आभार…