जागतिक महिला दिन १०० मराठी चारोळ्या women’s day charolya
इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला !
लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला !!
जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला !!
महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!
” ती आहे म्हणून…. सारे विश्व आहे !
ती आहे म्हणून…. घराला घरपण आहे.
ती आहे म्हणून…. सुंदर नाती आहेत!
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
नारी हीच शक्ती आहे नराची…
नारी हीच शोभा आहे घराची .!
नारी…
ना रोक सकेगा तुझको कोई
ग़र तू हिम्मत कर लेगी,
हर मंजिल मिल जाएगी
जब तू निडर हो चल देगी…
सफर शुरू कर तू अपना
हर डर पर जीत पाएगी,
मुश्किलें बेशक आएंगीं,
पर देख तेरा साहस
ख़ुद राह से हट जाएँगीं!!
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे,यशाची सोनेरी किनार !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार !!
कर्तुत्व आणि सामर्थ्याची, ओढून घे नवी झालर !
स्त्री शक्तीचा होऊ दे, पुन्हा एकदा जागर !!
ती आहे म्हणूने, सारे विश्व आहे..
ती आहे म्हणून, सारे घर आहे..
ती आहे म्हणून, सुंदर नाती आहेत.
आणि केवळ ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे
हसत मुखाने गीतही आले आज हो तुमच्यापुढे
या नारीशक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे
या इथे उतरली माता.. त्या रायगडाची माची
बांधुणी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची
हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चडे
या नारिशक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे.
नऊ महिने पोटात ठेऊन
आपल्या पहिल्या श्वासापर्यंत
वेदना सहन करते ती “आई”
आपल्या रक्तातील असून
दुसऱ्या घरी नांदायला जाते
परंतु रक्षाबंधनाला न विसरता
राखी बांधायला येते ती “बहीण”
मुलगी कोणाची, बहीण कोणाची
तरीही अखेरच्या श्वासापर्यंत
आपल्याला साथ देते ती “पत्नी”
जिला आपल्या मनातील
गुपित सांगतो ती “मैत्रीण”
“वार नाही तलवार आहे…. ती समशेरीची धार आहे…
स्त्री म्हणजे अबला नाही.. ती तर धगधगता अंगार आहे !!”
तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे…
तू कल्पना, तू सुनिता, आकाशात तुझी झेप आहे…
कित्येक रुपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू…
प्राणवायू कुटुंबा देई तीच मंगल तुळस तू…
थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा…
विश्वाच्या कल्याणासाठी स्त्रीशक्तीचा जागर व्हावा…
स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं.. डबक्यात राहून सागर दिसत नसतो त्यासाठी बाहेर यावं लागतं…
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू..!
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे…
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
मागे वळून पाहू नकोस,
परिवर्तनाच्या वाटेवर, टाक पाऊले !
तू तर आहेस आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले !!
जागतिक महिला दिन १०० मराठी चारोळ्या women’s day charolya
नभी झेपावणारी तू पक्षिणी…
सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी…
प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी…
शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिणी…
कष्टाच्या तुझ्या कणखर हातावर, खुलेल खरी मेहंदी !
तूच तर आहेस, पोलीस अधिकारी किरण बेदी !
स्त्री म्हणजे वात्सल्य!
स्त्री म्हणजे मांगल्य!!
स्त्री म्हणजे मातृत्व!
स्त्री म्हणजे कर्तुत्व!!
नारी तूच सावित्री,
नारी तूच जिजाई !
नारी तूच अहिल्या,
नारी तूच रमाई !!
ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे..
गंभीर नाही तर खंबीर आहे !
वार नाही तर तलवार आहे !!
बोठलेली नाही तर धार आहे !
स्त्री म्हणजे राख नाही तर,
पेटता अंगार आहे!!
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू.
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
जिव्हाळ्याने पाहिले तर बहिणीची माया देते !
लहानग्या बाळाला आईची छाया देते !!
अन् तिच्याशी जे पण कोणी नडते !
त्याला ती वाघिणीसारखे फाडते !!
शांत राहणे हा स्त्रीच्या स्वभावाचा भाग आहे !
वरूनी जरी पाणी असले तरी ती आतून आग आहे !!
वागणे तिचे एकदम कडक आणि सक्त आहे !
कारण तिच्या अंगात आई जिजाऊ चे रक्त आहे !!
ज्याला स्त्री आई म्हणून कळली, तो जिजाऊंचा शिवबा झाला !! ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली, तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला !! ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली, तो राधेचा श्याम झाला !! आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, तो सीतेचा राम झाला !!
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार !!
कर्तुत्व अन सामर्थ्याची, ओढून घे नवी झालंर
स्त्री शक्तीचा होऊ दे, पुन्हा एकदा जागर…
ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया,
कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया !
कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते,
सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते !!
थेंबा थेंबा मधून येथे, सामर्थ्याचा सागर व्हावा !
विश्वाच्या कल्याणासाठी, स्त्रीशक्तीचा जागर
व्हावा !!
महिला मुक्तीची ही भाषा, फक्त आज पुरतीच नको,
उत्सव आहे महिलांचा, म्हणून फक्त आरती नको !
ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल,
तेव्हाच सुरू होईल तुझ्या नव्या युगाची वाटचाल !!
स्त्री म्हणजे एक वाट,
अशक्य ते शक्य करून दाखवणारी,
अन्यायाला न्याय मिळवून देणारी,
अन् स्व-सुखाचा त्याग करून,
दुःखांना कवटाळणारी.!!
स्त्री म्हणजे विश्वास, अन् प्रगतीची खात्री,
तळपत्या उन्हात, डोईवर मायेची छत्री !
स्त्री म्हणजे मंद प्रकाश, न नुसत्या ज्वाला,
प्रेम आपुलकी अन् मायेचा जिव्हाळा !!
ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीण आहे,
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, तीच सुरुवात आहे,
आणि सुरुवातच नसेल तर, बाकी सारं व्यर्थ आहे.!!
मही म्हणजे पृथ्वी हिला म्हणजे सरस्वती !
शक्ती आणि बुद्धीच्या संगमाने महिला जपते संस्कृती !!
कवेत अंबर घेतानाही पाऊल तिचे जमिनी वरती ! !
महिला म्हणजे विश्वरूपी बासरीला सुर देणारी श्वासारती !!
कित्येक रुपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस
तू प्राणवायू कुटुंबा देई तीच मंगल तुळस तू…
व्यापलीस तू सर्व क्षेत्रे गाठलीस शिखरे यशाची !
कर्तव्याचा सदा राहून तत्पर लेख शोभसी जिजाऊ, सावित्रीची!!
स्त्री विना घराला घरपण नाही
ज्या घरात स्त्री नाही
ते घर घर असल्यासारखे वाटतच नाही
स्त्रीमध्ये घराला जोडून ठेवण्याची
अनोखी शक्ती असते अशा
स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा
नव्या युगात वाहिले वारे स्त्रीमुक्तीचे !
संघर्ष पदोपदी केला अन् मिळवले जे न्याय हक्काचे !!
हर क्षेत्रात स्थान मिळवले अव्वल दर्जाचे !
स्त्रीचा सन्मान करणे हेच खरे लक्षण पुरुषार्थाचे !!
स्वीकारून लेण हे मातृत्व !
अंगी उपजत गुण असे दातृत्व !!
धीराने करी हर घडी नेतृत्व !
अनमोल आहे महिलांचे श्रेष्ठत्व !!
थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा
विश्वाच्या कल्याणासाठी स्त्रीशक्तीचा जागर व्हावा
स्त्री मनाची विशालता कळायला,
मन विशाल असावं लागतं ! !
डबक्यात राहून सागर दिसत नसतो,
त्यासाठी बाहेर यावं लागतं !
तू जिजाऊ, तू सावित्री,
अहिल्याची तू लेक आहे…
तू कल्पना, तू सुनिता,
आकाशात तुझी झेप आहे…
तीच आहे सृजनाची निर्मिती,
तिच्यामुळे तेवतात दिव्यातील वाती,
चहूकडे प्रकाश देऊनी जगतास ती उध्दारी !
त्यो विश्वशक्तीचे नाव आहे नारी !
ज्योतिबांची ती क्रांतिज्योती सावित्री
त्यागाची प्रतीक ती शिवबाची जिजाई,
भीमरावांची सावली, ती रमाई,
रणांगणांवर लढते जशी राणी लक्ष्मी
त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी!
तू आदिशक्ती तुच महाशक्ती
वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने
सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
विधात्याने घडवली सृजनांची
सावली,निसर्गाने भेट दिली आणि
घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा.