०८ मार्च जागतिक महिला दिन मराठी भाषण marathi speech on women’s day
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो मी तुम्हाला आज जागतिक महिला दिन या विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी त्यांना सर्वांना विनंती करते
marathi speech on women’s day आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षीप्रमाणे आठ मार्च रोजी साजरा केला जातो वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दररोज कठोर महिन्यात करणाऱ्या महिलांना दिन साजरा करण्याचा हा दिवस होय.
जगामध्ये असे देश आहेत की जिथे महिलांना समान अधिकार नाहीत या देशांमध्ये महिलांची भूमिका केवळ घरगुती कामापुरतीच मर्यादित राहिलेली आहे हे बदलले पाहिजे कारण स्त्रिया प्रत्येक गोष्टीत पुरुषांना ज्या संधी मिळतात त्या संधीसाठी महिला पात्र आहेत.
आधुनिक जग हे स्त्री पुरुष समानतेकडे वाटचाल करत आहे आज समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांना अधिक विशेष अधिकार आहेत तरीपण हे बदलले पाहिजे कारण आपण सर्व मानव जात आहोत आणि आपण सर्व समान हक्क आणि संधींना पात्र आहोत.
marathi speech on women’s day आंतरराष्ट्रीय महिला दिन हा एक असा दिन आहे जेव्हा प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींची प्रशंसा करतो हा एक दिवस आहे जेव्हा प्रत्येक जण आपल्या जीवनातील स्त्रियांचे मूल्य आणि महत्त्व ओळखतो जगातील स्त्रियांचे अपार महत्त्व आहे.
पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मूल पाहु दिले जायचे मुलींना महिलांना शिक्षण मिळत नसायचे अशा या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर निघणे देखील पाप समजले जायचे स्त्रियांना शिक्षण तर खूप लांबची गोष्ट होती अशाच काळामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली आणि स्त्रियांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास सुरुवात झाली महिला शिकल्या महिला सफल झाल्या महिलांना सक्षम करण्यासाठी शिक्षण ही एकमेव गरज त्यांची होती ती गरज पूर्ण करण्याचं काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा फुले या दांपत्याने केले.
आज स्त्रिया आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अग्रेसर दिसत आहेत जगामध्ये कुठलेही शेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये कुठेही स्त्रिया मागे नाहीत.
आज सीमेवरती लढण्यासाठी पण महिला सज्ज झालेले आहेत अनेक महिला पायलट बनलेले आहेत आर्मी जवान मध्ये देखील त्या काम करत आहेत महिला या सक्षम बनलेले आहेत त्यामुळे पुरुषांच्याही पुढे जाऊन महिला काम करत आहेत.
देशामध्ये मोठ मोठ्या पदांवर महिला आहेत आयएएस घ्या आयपीएस असेल डॉक्टर इंजिनियर वकील क्षेत्रामध्ये असेल राजकारणामध्ये असतील महिला मोठ मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री महिला आहेत आज आपल्या देशाचे राष्ट्रपती एक महिलाच आहे.
महिलांच्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास व्हावा महिला सबलीकरण व्हावे म्हणून आपले केंद्र सरकार महिलांना बचत गटातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवत आहे अशा उपक्रमामुळे महिलांच्या हाताला काम मिळत आहे आणि महिला स्वावलंबी होत आहेत.
महिलांचा आदर फक्त आजच्या दिवसा पुरता मर्यादित न ठेवता महिलांचा सन्मान आदर आपण वेळोवेळी केलाच पाहिजे अशा प्रकारची प्रतिज्ञा घेऊया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत.